Ameya Khopkar | (File Image)

बिग बॉस सीजन 14 (Bigg Boss 14) मध्ये असलेला एक स्पर्धक जान जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) याला मनेस (MNS ) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी इशारा दिला आहे. सानू याने 'मराठी भाषेची चिड येते' अशा आशयाचे उद्गार बिग बॉस शोदरम्यान काढले होते. त्यानंर खोपकर यांनी ट्विटरवरुन त्याला हा इशारा दिला आहे. अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून जान कुमार सानू याला इशारा दिला आहे. 'मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो. 'आम्ही मराठी तुला लवकरच तुला थोबडवणार' असे म्हणत सानूय याला इशारा दिला आहे. दरम्यान, खोपकर यांनी कलर्स वाहिनीवरही नाराजी व्यक्त केली आहे.

'तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो'

गायक जान कुमार सानू याला ट्विटरद्वारे इशारा देताना अमेय खोपकर यांनी म्हटले आहे की, 'जान कुमार सानू मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी'.

'गद्दारांची तोंड कशी असतात ते समजलं'

अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून कलर्स वाहिनीवरही आपली नाराजी व्यक्त केली आहे. खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं'.

शिवसेनेचाही इशारा

दरम्यान, अमेय खोपकर यांच्यानंतर आता शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांनी जान सानू याला इशारा दिला आहे. सरकनाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही. (हेही वाचा, Bigg Boss 14 Update: बिग बॉस 14 मध्ये निक्की तंबोली आणि सिद्धार्थ शुक्लाचा Hot Rain Dance व्हिडिओ झाला व्हायरल, Watch Video)

काय घडलं?

बिग बॉस 14 च्या पर्वामद्ये गायक राहुल वैद्य, निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. दरम्यान, निक्की तांबोली ही राहुल वैद्य आणि जान सानू यांच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी , ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे उद्गार जान सानू याने काढले. त्यावरुन वातावरण पेटण्याची शक्यता आहे.