गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेला सलमान खान (Salman Khan) चा शो बिग बॉस चा 14 (Bigg Boss 14) वा सीजन अखेर सुरु झाला आहे. या सीजनचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोरोनाशी संबंधित सर्व खबरदारी घेण्यात आली असून त्या पद्धतीचे बिग बॉसचे घर बनविण्यात आले आहे. तसेच यात आधीच्या सीजनचे सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla), गौहर खान (Gauhar Khan) आणि हीना खान (Heena Khan) देखील 2 आठवड्यांसाठी पाहुणे स्पर्धक म्हणून आले आहेत. त्यामुळे दरदिवसा या शो मध्ये मसालेदार किस्से पाहायला मिळत आहे. त्यातच आता सिद्धार्थ शुक्ला आणि निक्की तंबोली (Nikki Tamboli) यांनी केलेला हॉट रेन डान्सचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला असून तो व्हायरल होत आहे.
बिग बॉस फॅन क्लबद्वारा शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये निक्की सिद्धार्थसह डान्स करताना दिसत आहे. तर रुबीना दिलैक, जैस्मीन भसीन, पवित्रा पुनिया सुद्धा आपल्या मेंटर सिद्धार्थ शुक्लावर अटॅक करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. Bigg Boss 14: घरात एन्ट्री केलेल्या राधे मां ने केला डान्स, सिद्धार्थ शुक्ला याला मिळाला अशीर्वाद (Watch Video)
या व्हिडिओमध्ये निक्की आपल्या मादक अदांनी जबरदस्त हॉट डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये घरातील अन्य सदस्य निक्की तंबोलीवर नाराज आहेत आणि त्यांना प्रश्न पडला आहे की ते हिना खानकडून घरासाठी कोणत्या 7 वस्तू घ्याव्यात. तिकडे निक्की तिच्यासाठी 2 वस्तूंना घेऊन अडून बसली आहे.
तर दुसरीकडे गौहर खान ने असे म्हटले आहे की जोपर्यंत हा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत घरातल्यांना जेवण मिळणार नाही. त्यामुळे या घरात आता आणखी काय काय घडणार हे पाहण्यासाठी हा कार्यक्रमच बघावा लागेल.