नात्याला दोन वर्ष पूर्ण झाल्याने 'Happy 2' म्हणत ईशा केसकर हिने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा खास फोटो (Photo)
Isha Keskar and Rishi Saxena (Photo Credits: Instagram)

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील नवी शनाया आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गर्लफ्रेंड' सिनेमातून आपल्या भेटीला आलेली कावेरी म्हणजेच ईशा केसकर सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या ईशाने एक खास फोटो शेअर केला असून त्याची भलतीच चर्चा होऊ लागली आहे. (Girlfriend Movie Review: नात्यामधील प्रेमाची भावना उलगडत चेहऱ्यावर हसू आणणारी 'Girlfriend' आयुष्यात जरुर भेटावी!)

ईशा केसकर आणि ऋषी सेक्सेना यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र आज त्यांच्या नात्याला दोन वर्ष पूर्ण झाल्याने या स्पेशल दिवशी ईशाने ऋषीसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते, कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हा फोटोही अगदी धमाल असून यात दोघांचीही केमिस्ट्री दिसून येते.

हा फोटो शेअर करताना ईशाने लिहिले की, "दोन वर्षांपूर्वी या दिवशी अखेर हा मुलगा मला डेट करायला तयार झाला. हॅप्पी 2. अजून अनेक वर्ष यायची आहेत." तसंच फोटो शेअर करताना तिने एक खास सूचनाही लिहिली आहे. त्यात ती म्हणते- "लग्न कधी? असा प्रश्न कृपया विचारु नका."

ईशा केसकर हिची पोस्ट:

'काहे दिया परदेस' या मराठी मालिकेतून ऋषी सक्सेना घरोघरी पोहचला. त्यानंतर त्याचा हिंदी मालिकेतील प्रवास सुरु आहे. तर 'जय मल्हार' या मालिकेतील ईशाने साकारलेली 'बानू' लक्षवेधी ठरली. त्यानंतर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिका सुनीलची एक्झिट झाल्यावर शनाया साकारण्याची संधी ईशाला मिळाली. त्याचबरोबर अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या 'गर्लफ्रेंड' सिनेमातही ईशा झळकली.