अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि श्वेता बच्चन सह 'या' मराठी अभिनेत्रीला मिळाली जाहिरातीत झळकण्याची संधी, Watch Video
Pooja Sawant With Big B (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी हे स्वप्न सिनेसृष्टीतील सर्वच कलाकारांचे असते आणि जर तशी संधी मिळाली तर त्यांच्यासाठी स्वप्नपूर्ती झालेली असते. हेच स्वप्न पूर्ण झालय मराठी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिचे...मात्र तिचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालाय त्याला कारण म्हणजे पूजा सावंत न केवळ अमिताभ बच्चनसह तर त्यांची पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) आणि मुलगी श्वेता बच्चनसह (shweta Bachchan) काम करण्याची संधी मिळाली आहे. एका जाहिरातीत हे बच्चन कुटूंबिय आणि त्यांच्या सोबत पूजा सावंत झळकली आहे. अमिताभ बच्चन ने ही जाहिरात सोशल मिडियावर शेअर केली आहे.

ही जाहिरात कल्याण ज्वेलर्सची आहे ज्याचे ब्रँड अॅम्बेसेडर बिग बी आहेत. या जाहिरातीत पूजा सावंत छान मराठमोळ्या नववधूच्या वेशात बिग आणि त्यांच्या कुटूंबियांसोबत येताना दिसत आहे.

हेदेखील वाचा- बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकेल मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिचा हा बोल्ड अंदाज, पाहा फोटोज

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

हा व्हिडिओ बिग बींनी इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर पूजा सावंत ने या पोस्टखाली कमेंट केले आहे. "तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा अनुभव कायम माझ्या स्मरणात राहिल." असे पूजा सावंतने लिहिले आहे.

पूजा ला पहिल्यांदाच बिग बीं सोबत जाहिरातीच्या माध्यमातून का होईना पण काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे ती ही प्रचंड खूश आहे.

नुकताच 25 जानेवारीला पूजा सावंतने आपला 31 वा वाढदिवस साजरा केला. 'महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर' या रिअॅलिटी शोच्या मंचावर देखील सर्व टीमने तिचा वाढदिवस दणक्यात साजरा केला.