महाराष्ट्राची हास्य जत्रा 19 ऑगस्ट पासून पुन्हा  प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर शेअर केला प्रोमो (Watch Video)
Maharashtarchi Hasya Jatra (Photo Credits: Instagram)

टीव्ही मालिकांच्या रडगाण्यातून दोन क्षणांची सुटका देणारा, आणि प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा सोनी मराठी (Sony Marathi)  वाहिनीवरील कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtrachi Hasya Jatra)  एका नव्या पर्वासोबत पुन्हा एकदा भेटीस येणार आहे.काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचे दुसरे पर्व संपले त्यानंतर चॅनेल वर जुने एपिसोड्स दाखवण्यात येत होते मात्र प्रेक्षकांना नवीन पर्वाची आतुरता होती, अखेरीस ही प्रतीक्षा संपवून येत्या 19 ऑगस्ट पासून सोमवार ते गुरुवार दरम्यान रात्री 9 वाजता ही हास्य जत्रा पुन्हा सुरु होणार असल्याचे समजत आहे. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. सई ताम्हणकर (Sai Tamhankar),  प्रसाद ओक (Prasad Oak)  व सोबतच हास्यजत्रेच्या अनेक चाहत्यांनी हा प्रोमो आपल्या अकाउंट वरून देखील शेअर केला आहे.

महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा हंगाम (Watch Video)

 

View this post on Instagram

 

Yeyyyy and we are back ! @sonymarathi याह्ह्ह!!!!!

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

प्रोमो मध्ये दाखवल्यानुसार, यावेळेस नव्या पर्वात सई ताम्हणकर, प्रसाद ओक यांच्यासोबत कॉमेडीकिंग मकरंद अनासपुरे आणि मेलोड्रामाची राणी अलका कुबल सुद्धा पाहायला मिळणार आहे.तर सूत्रसंचालकाच्या रूपात याहीवेळेस प्राजक्ता माळीच दिसणार आहे. मराठी व हिंदी कार्यक्रमात गाजलेले कलाकार स्पर्धक, दमदार ताकदीचे परीक्षक यांचीही टीम यावेळेस महाराष्ट्राची हास्य जत्रेचा एक नवा हंगाम घेऊन येणार आहे.

दरम्यान, हास्यजत्रेचे मागील दोन्ही सीझन सुपरहिट ठरले होते. शेवटच्या पर्वात सई आणि प्रसाद सोबत महेश कोठारे हे परीक्षकाच्या खुर्चीत पाहायला मिळाले होते. स्पर्धकांच्या दोन वेगळ्या ग्रुप मध्ये भरलेल्या कॉमेडीच्या जत्रेत अनेक नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आली होती, ज्याचे सोने करून या मातब्बरांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. याही वेळीस एका पेक्षा एक स्किट्स मधून पुन्हा एकदा आपल्याला हसवण्यासाठी हे कलाकार सज्ज आहेत, त्यामुळे आता प्रेक्षकांना फक्त 19 ऑगस्ट पर्यंत वाट बघायची आहे.