Koffee With Karan 6: करणच्या काऊचवर अर्जुन सोबत जान्हवी कपूरची  धम्माल मस्ती
अर्जुन सोबत जान्हवी कपूर Photo credits Instagram

श्रीदेवीच्या अकाली निधनानंतर बोनी कपूरची चारही मुलं एकमेकांच्या खूप जवळ आली आहेत. टेलिव्हिजनवर अभिनेता अर्जुन कपूर त्याची सावत्र बहीण जान्हवी कपूर सोबत एकत्र दिसणार आहे. करण जोहरचा कॉफी विथ करण सिझन ६ लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. नव्या सिझन मध्ये करणच्या काऊच वर कोण कोण वर येणार याबाबत रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. मात्र काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या शूटिंग दरम्यान सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खानचं शूटिंग झालं आहे. त्यानंतर आता जान्हवी आणि अर्जुन कपूरने करणच्या शो मध्ये उपस्थिती लावली आहे.

जान्हवी कपूरने करण जोहरची निर्मिती असलेल्या 'धडक' या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं आहे. कारण च्या कॉफी विथ करण शोमध्ये जान्हवी पहिल्यांदा उपस्थिती लावणार आहे. शूटिंग दरम्यानची काही धम्मालमस्ती जान्हवी आणि अर्जुनने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे.

अर्जुन हा बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. १९९६ साली बोनी कपूर यांनी अभिनेत्री श्रीदेवी सोबत लग्न केलं. जान्हवी आणि ख़ुशी या श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या मुली आहेत. श्रीदेवीच्या अकाली निधनानंतर ख़ुशी आणि जान्हवीच्या मागे अर्जुन खंबीर पणे उभा राहिला. 'धडक' चित्रपटादरम्यानही अर्जुनने जान्हवीला खास शुभेच्छा आणि सल्ला दिला होता. श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कापराच्या चारही मुलांच्या आयुष्यात आलेला बदल कसा आहे? याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. करणाच्या शोमध्ये याची उत्तर मिळणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.