Sindhutai Sapkal in KBC 11 (Photo Credits: Instagram)

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा क्वीझ शो 'कौन बनेगा करोडपती' चे 11 (KBC 11) वे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. या शोचा पहिला एपिसोड 19 ऑगस्ट दिवशी ऑन एअर गेला आहे. आता यंदाच्या पर्वातील पहिला 'कर्मवीर स्पेशल एपिसोड ' (Karamveer Special Episode) आज (23 ऑगस्ट) दिवशी रंगणार आहे. यामध्ये अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) हजेरी लावणार आहेत. शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी सिंधुताईचे स्वागत त्यांच्या पाया पडून केले आहे.

आज हिंदी केबीसीमध्ये कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये सिंधुताई सपकाळ आल्यानंतर त्यांनी संघर्षाची कहाणी सांगितली आहे. अनाथांना आरसा देण्यासाठी महाराष्ट्रभरातील लेकरांची आई झालेल्या सिंधुताई सकपाळ यांनी त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये त्यांनी सिंधुताई नेहमी 'गुलाबी रंगाची साडी का नेसतात?' हा प्रश्न विचारला आहे. त्यावर पहा सिंधुताई सकपाळ यांनी काय दिलं उत्तर?

कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये सिंधुताई सपकाळ

स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंगाचा सामना करून देखील त्यांनी समाजातील अनाथांना आसरा देण्याचा पर्याय निवडला. मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना करून अनाथांसाठी त्यांनी आपल्या घराची दारं उघडली आहेत.