Kaun Banega Crorepati 14 Registrations: केबीसी 14 चं रजिस्ट्रेशन 9 एप्रिलपासून होणार सुरू; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया
Kaun Banega Crorepati 14 (Photo Credits: Twitter)

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हे आता टेलिव्हिजनवरील समीकरण झाले आहे. लवकरच केबीसीचा 14 वा सीझन येणार आहे. सोनी टीव्ही वर येणार्‍या केबीसीचे जगभरात चाहते आहेत. इंडियन टेलिव्हिजनवरील हा लोकप्रिय आणि यशस्वी शो पैकी एक आहे. लोकांची करमणूक करण्यासोबतक सामान्य ज्ञान देखील देण्याचा,वाढवण्याचा यामधून प्रयत्न होतो. एका प्रोमोद्वारा केबीसी 14 साठी रजिस्ट्रेशन डेट जाहीर करण्यात आली आहे.

केबीसी 14 ची रजिस्ट्रेशन 9 एप्रिलच्या रात्री 9 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. यंदाही मागील वर्षीप्रमाणे रजिस्ट्रेशन ही डिजिटल पद्धतीने होणार आहेत.

कसं कराल रजिस्ट्रेशन?

केबीसी 14 चं रजिस्ट्रेशन करण्यासाठी 9 एप्रिलच्या रात्री 9 वाजता बिग बींकडून विचारल्या जाणार्‍या प्रश्नाचं अचूक उत्तर देणं आवश्यक आहे. टेलिव्हिजनवर सोनी टीव्ही वर हा प्रश्न विचारला जाणार आहे. तुमच्याकडे टीव्ही नसेल तर SonyLIV app वरही त्याच दिवशी त्याच वेळी हा प्रश्न विचारला जाणाए आहे. हॉट सीटपर्यंत पोहचण्यासाठी रजिस्ट्रेशन, स्क्रिनिंग,ऑनलाईन ऑडिशन आणि मुलाखत अशा विविध टप्प्यातून जावं लागणार आहे.

प्रोमो

साल 2000 पासून टीव्हीवर केबीसी सुरू आहे. केवळ तिसरा सीझन वगळता बाकी अन्य सीझनचे सूत्रसंचलन बीग बींनी केले आहे. तिसर्‍या सीझनला शाहरूख खान होस्ट होता. या शोमध्ये सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटींनीही हजेरी लावत चार चांद लावले आहेत. हिंदी प्रमाणे हा शो मराठीतही होतो.