टीव्ही वरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) चा 11 सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छुक असाल तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया उद्यापासून पासून होणार आहे. खुद्द अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या ब्लॉगद्वारे ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. तसंच या शो चा पहिला प्रोमो देखील समोर आला आहे. सोनी मराठीवर लवकरच रंगणार 'हॉट सीट' वरचा उत्कंठावर्धक खेळ, पहा पहिली झलक (Video)
कौन बनेगा करोडपती प्रोमो:
असा असेल हॉटसीट पर्यंतचा प्रवास:
तुम्हाला यंदा हॉट सीटचा अनुभव घ्यायचा असेल तर या 6 स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1:
KBC च्या प्रमोशन दरम्यान दर दिवशी प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला जाईल. या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करा. ही प्रक्रीया 1 मे पासून सुरु होणार आहे. प्रक्रीया यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल आणि तुमची निवड झाल्यास शो ची टीम तुम्हाला संपर्क करेल.
स्टेप 2:
सुमारे 9990 लोकांना कॉल सेंटरचे एक्झिक्युटीव्ह फोन करतील. फोनवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. जर तुम्ही प्रश्नांची नीट उत्तरे देऊ शकला नाही तर तुम्हाला पुन्हा एका कॉल केला जातो. मात्र दुसऱ्यांदाही तुम्ही योग्य उत्तरे देऊ शकाला नाहीत तर मात्र तुमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल होते.
स्टेप 3:
ऑडिशनची जागा आणि तारीख स्पर्धकाला कळवण्यात येते. त्यानुसार आपले पासपोर्ट साईज चार रंगीत फोटो, पॅन कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, पासपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन ऑडिशनसाठी जावे लागेल. त्याचवेळी फोन ए फ्रेंड या लाईफ लाईनसाठी तुम्ही कोणत्या मित्राला कॉल कराल हे ठरवले जाते. त्याचबरोबर मित्राचे नाव आणि चार पासपोर्ट साईज फोटो देणे आवश्यक असते.
स्टेप 4:
स्पर्धकाला दोन एन्ट्रेस टेस्ट द्यावा लागतात. यात लेखी आणि व्हिडिओ या दोघींचा समावेश असतो. या परिक्षेत पास झालेल्या स्पर्धकाला या शो मध्ये पुढे जाण्याची संधी मिळते.
स्टेप 5:
एन्ट्रेस टेस्ट पास केल्यानंतर स्पर्धकाला तीन सदस्यीय मेंबर्सचा सामना करावा लागतो. त्यानंतर फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंटसाठी लिस्ट तयार केली जाते. यासाठी दोन लिस्ट तयार करण्यात येतात. जर कोणता स्पर्धक गैरहजर असल्यास दुसऱ्या स्पर्धकाला संधी मिळते.
स्टेप 6:
फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड हा शो च्या सुरुवातीला दाखवला जातो. यात चार पर्यायांसह एक प्रश्न विचारला जातो. यात सर्वात जलद गतीने उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला संधी दिली जाईल. मात्र या राऊंडमध्ये यश न मिळाल्यास स्पर्धकांना पुढे हा खेळ खेळता येत नाही.
यंदाच्या सीजनमध्ये सहभागी होत तुम्ही देखील आपले नशिब आजमवून पहा.