Kon Honaar Crorepati : सोनी मराठीवर लवकरच रंगणार 'हॉट सीट' वरचा उत्कंठावर्धक खेळ, पहा पहिली झलक (Video)
Kon Honaar Crorepati (Photo Credits: Instagram)

Kon Honaar Crorepati : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अजरामर केलेल्या 'कौन होगा करोडपती?' या रिअ‍ॅलिटी गेम शोची धूम आता लवकरच मराठी रसिकांना पहायला मिळणार आहे. कौन होगा करोडपतीच्या मराठी व्हर्जनमध्ये चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे.यापूर्वी कलर्सवर पाहिलेला शो लवकरच 'सोनी मराठी' (Sony Marathi) या वाहिनीवर रसिकांच्या भेटीला येणार आहे. मराठीमध्ये या गेम शोचं नाव 'कोण होणार  करोडपती' (Kon Honaar Crorepati) असं असेल. नुकताच या शोची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे.

कोण होईल करोडपती' चा सूत्रसंचालक कोण?

मराठीमध्ये आलेल्या या रिअ‍ॅलिटी मराठी गेम शोचं सूत्रसंचलन यापूर्वी अभिनेता सचिन खेडेकर आणि स्वप्नील जोशी यांनी केलं होतं. आता चौथा भाग कसा असेल? त्याचा होस्ट कोण असेल? याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

युकेमध्ये Who Want To Become a Millionaire हा मूळ शो 4 सप्टेंबर 1998 मध्ये United Kingdom मध्ये प्रदर्शित झाला त्यानंतर तो भारतामध्ये आला. हिंदी भाषेत अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांनी विविध स्वरूपात हा शो होस्ट केला.