TV Actor Pavithra Jayaram Passes Away: कन्नड टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामचा कार अपघातात मृत्यू, बहिणीसह तीन जण गंभीर जखमी
TV Actor Pavithra Jayaram (PC - X/ANI)

TV Actor Pavithra Jayaram Passes Away: लोकप्रिय कन्नड आणि तेलुगू अभिनेत्री पवित्रा जयराम (Pavithra Jayaram) हिचा तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात कार अपघातात (Car Accident) मृत्यू झाला. रविवारी बेंगळुरूहून हैदराबाद (Hyderabad) ला परतत असताना महबूबनगर जिल्ह्यातील दिविटिपल्ली येथे हा अपघात (Accident) झाला. भूतपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महबूबनगर जिल्ह्यातील दिविटिपल्ली येथे काल रात्री 1 वाजता एका रस्ता अपघातात अभिनेत्रीचा मृत्यू झाला. ती बेंगळुरूहून हैदराबादला जात होती. कारचे नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकाला धडकली. त्यानंतर एका बसने तिच्या वाहनाला धडक दिली.

या अपघातात पवित्रा यांचा मृत्यू झाला, तर तिचा चुलत भाऊ आणि ड्रायव्हर या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. तिच्या मृत्यूने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली असून अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेता समीप आचार्य यांनी अभिनेत्रिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले आहे की, 'तू आता नाहीस या बातमीने जाग आली. हे अविश्वसनीय आहे. माझी पहिली ऑन-स्क्रीन आई, तू नेहमीच खास राहशील.' (हेही वाचा - Chetan Chanddrra Attacked: कन्नड अभिनेता चेतन चंद्रावर हल्ला; रक्तबंबाळ झालेल्या अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करून मागितला न्याय, पहा व्हिडिओ)

कोण आहे पवित्रा जयराम?

पवित्राने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील जोकली मालिकेतून केली. 2018 मध्ये, तिने निन्ने पेल्लादथा सोबत तेलुगु टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. 'तिलोत्तमा' या टीव्ही सीरियलने तिने घराघरात लोकप्रियता मिळवली. कन्नड टेलिव्हिजन मालिकेतील भूमिकांसाठी ही अभिनेत्री प्रसिद्ध होती. त्याशिवाय तिने इतर भाषांमध्ये काम केले. पवित्राने तेलगू मालिकांमध्येही तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.