'जयडी' फेम  किरण ढाणे मालिकेतून पुन्हा येतेय रसिकांच्या भेटीला, नव्या अंदाजात होणार एंट्री
Kiran Dhane (Photo Credits: Facebook)

लागिर झाल जी (Lagira Zhala Jee) या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत 'जयडी' (Jaidee)आणि 'मामी' ही पात्रअल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनले होते. मात्र प्रोडक्शन कंपनीसोबत झालेल्या काही मतभेदानंतर त्यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रेक्षक काहीसे नाराज झाले होते. मात्र आता मालिकेच्या माध्यमातूनच 'जयडी' म्हणजेच किरण ढाणे (Kiran Dhane) ही अभिनेत्री पुन्हा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

किरण ढाणे आता सोनी मराठीवरील 'एक होती राजकन्या' या नव्या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असून यापूर्वी नकारात्मक भूमिका साकारणारी किरण आता डॅशिंग महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

kiran Dhane (file Photo)

लाँच झालेल्या प्रोमोमध्ये या राजकन्येचे बाबा आपली मुलगी कसं आयुष्य जगेल याचं कवितारूपी मनोगत स्पष्ट करताना दिसतात मात्र त्याच्या अगदी विरूध्द या राजकन्येचं खरं आयुष्य आहे. काहीकारणास्तव अवघडलेलं आयुष्य आणि त्याच्याशी दोन हात करत आपलं आयुष्य जगणारी ही राजकन्या. नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या ह्रदयात आपलं स्थान निर्माण करणारी जयडी म्हणजेचअभिनेत्री किरण ढाणे या राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे तर तिच्या बाबांची भूमिका किशोर कदम म्हणजेच कवी सौमित्र यांनी साकारली आहे.

'यापूर्वी खलनायकी भूमिका केल्यानंतर तशाच भूमिकांसाठी अनेक ऑफर्स आल्या. मात्र, मला एका चौकटीत अडकायचं नव्हतं. 'एक होती राजकन्या'च्या निमित्तानं, एका खंबीर मुलीची भूमिका मला साकारायला मिळतेय. खाकी वर्दीत असणारी ही अवनी जयडीसारखीच प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा असल्याचं, किरण ढाणेने स्पष्ट केलं आहे.