Ravi Dubey (PC- Instagram)

Ravi Dubey Tests Positive For COVID 19: देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर टिव्ही अभिनेता रवी दुबे रविवारी कोविड संक्रमित झाला. 'जमाई राजा' फेम अभिनेत्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. अभिनेत्याने आपल्या पोस्टमधील लोकांना विनंती केली आहे की, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. रवी दुबेने स्वतःला आयसोलेट केलं आहे. रवी दुबे यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. चाहत्यांसह टीव्ही स्टार्स अभिनेत्याच्या पोस्टवर सतत कमेंट करत असून त्याच्या त्वरित रिकव्हरीसाठी शुभेच्छा देत आहेत.

रवी दुबे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "हाय मित्रांनो माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शेवटच्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकास विनंती आहे की, त्यांनी स्वत: ला वेगळे करावे आणि कोविडच्या सामान्य लक्षणांची काळजी घ्या. मी माझ्या प्रियजनांसाठी स्वत: ला वेगळं केलं आहे. सुरक्षित रहा... सकारात्मकतेने राहा (आशावादी रहा) देव आपल्या सर्वांचे रक्षण करील. " (वाचा -Jr NTR Tested COVID Positive: दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण, ट्विटद्वारे दिली माहिती)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Dubey 1 (@ravidubey2312)

रवीची पत्नी अभिनेत्री सरगुन मेहता यांनी सॅड इमोजीची प्रतिक्रिया करत पतीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. 'बिग बॉस 14' फेम शहजाद देओल, अहाना कुमार, पुलकित सम्राट, विकास खत्री, पराग मेहता, शिखा सिंग शहा, आशा नेगी या तिघांनीही टिप्पणी केली आहे असून अभिनेत्याला लवकरात लवकर बरे होण्याची शुभेच्छा दिल्या आहेत. रवी दुबेने त्याच्या ओटीटी शो जमाई राजा 2.0 मध्ये प्रचंड यश मिळवले आहे. शोमधील त्याच्या उत्तम अभिनयाचे खूप कौतुक झाले. या शोमध्ये तो निया शर्मासोबत दिसला होता.