Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील रोशन सोधीने केला असित मोदींवर लैंगिक छळाचा आरोप
Jennifer Mistry Bansiwal (PC - Instagram)

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. यापूर्वी शैलेश लोढा यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. आता रोशन सोधीची भूमिका करणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवाल (Jennifer Mistry Bansiwal) ने असित मोदींवर लैंगिक छळाचा (Sexual Harassment) आरोप केला आहे. जेनिफरने निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत मार्चमध्येच शो सोडल्याचेही सांगितले आहे. मात्र, असित मोदींनी हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे, या आरोपानंतर जेनिफरने चाहत्यांना कडक संदेश दिला आहे.

जेनिफर मिस्त्री बन्सीवालने अलीकडेच सेटवर तिच्यासोबत काय घडले याचा खुलासा करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. यात तिने सांगितलं की, असित मोदींनी एकदा तिला सांगितलं होतं की तू खूप सुंदर दिसत आहेस. मला तुला धरून चुंबन घ्यायचे आहे. असित मोदींसोबतच जेनिफरने शोचे प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या सर्व प्रकारानंतर तिने इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना कडक संदेश दिला आहे. (हेही वाचा - R Madhavn पहिल्यांदाच Ajay Devgan सोबत शेअर करणार स्क्रिन, दिसणार 'या' हॉरर थ्रिलर चित्रपटात)

जेनिफरने इन्स्टा स्टोरीवर मेसेज पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे की, बाहेर येऊन सत्य बोलणे आणि तुम्ही कोण आहात हे दाखविण्यापेक्षा शक्तिशाली काहीही नाही. जेनिफर मिस्त्रीने सांगितले की, तिने शेवटचा एपिसोड 6 मार्च रोजी शूट केला होता. सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांनी त्यांचा अनेकदा अपमान केला. त्यामुळे आपला अपमान सहन न झाल्याने त्याने शोमधून बाहेर पडणे योग्य मानले. यासोबतच असित मोदींनी तिला पकडून चुंबन घेण्यास सांगितले, असा आरोपही जेनिफरने केला आहे.

या आरोपांनंतर जेनिफरने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती म्हणाली, मौनाला माझी कमजोरी समजू नका, मी गप्प बसले कारण माझ्याकडे शिष्टाचार आहे. जे सत्य आहे त्याचा देव साक्षी आहे. लक्षात ठेवा देवाकडे कोणताही फरक नाही.