गणेशोत्सव 2018 : मेघा धाडेच्या घरी गणेशोत्सवात मोदकाच्या आकारातील केक कापून सेलिब्रेशन
बिग बॉस मराठी 1ची विजेती मेघा धाडेचा गणेशोत्सव, photo credits: Instagram

गणेशोत्सावाला सुरूवात झाली की आपोआपच घरात चैतन्याचं वातावरण निर्माण होतं. बाप्पाचा प्रसाद, आरती, नैवेद्य याची रेलचेल आणि वेळा पाळण्याचं गणित सुरू होतं. प्रत्येक घरात परंपरंनुसार वेगवेगळा नेवैद्य बनवण्याची पद्धत असते. बिग बॉस विजेत्या मेघा धाडेने यंदा चक्क बाप्पासमोर मोदकाच्या आकारातील केक कापला आहे.

मेघा धाडेच्या घरी उत्साहात गणेशोत्सव

मराठी बिग बॉसचं विजेतेपद पटकावल्यानंतर यंदा मेघा धाडेच्या घरी यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मेघा धाडे गणेशोत्सवाच्या सुरूवातीच्या दिवसात व्हायरल फिव्हरने आजारी असल्याने तिचे चाहते काळजीत होते. मात्र आता दुप्पट उत्साहाने मेघा गणेशोत्सव साजरा करत आहे.

बिग बॉस जिंकल्यानंतर पहिल्या गणेशोत्सवामध्येही मेघाच्या विजेतेपदाचं सेलिब्रेशन सुरू आहे. अभिनेत्री स्नेहा वाघने मेघाच्या घरी हे सेलिब्रेशन केलं.

मोदकाच्या आकारातील केक

स्नेहाने मेघाच्या घरी यंदा मोदकाच्या आकारातील केक आणला होता. हा केक मेघाने बाप्पासमोर कापून खास अंदाजात सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा खास व्हिडिओ आणि फोटोदेखील मेघाने सोशल मीडिया साईट्सवर शेअर केले आहेत. नक्की पहा : बिग बॉसकडून मेघा धाडेला मिळालेल्या घराचे खास फोटो !