Atul Parchure Suffering From Cancer: प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे देत आहेत कॅन्सरशी झुंज; म्हणाले, चुकीच्या उपचारामुळे प्रकृती बिघडली
Atul Parchure (PC - Instagram)

Atul Parchure Suffering From Cancer: अनेक वेळा पडद्यावर आपल्या अभिनयाने लोकांना हसवणारे चेहरे प्रकृतीच्या वेगवेगळ्या समस्यांशी झगडत असतात. 'द कपिल शर्मा शो' फेम अतुल परचुरे (Atul Parchure) यांच्याबाबतही धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या विनोदांनी आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा अतुल परचुरे कॅन्सरने ग्रस्त आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वतः यासंदर्भात खुलासा केला आहे. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत अतुलने त्याच्या आजाराशी संबंधित एक दुःखद गोष्ट शेअर केली. त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली होती. जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होतो. तेव्हा सर्व ठीक होते. पण काही दिवसांनी मला जेवायला त्रास होऊ लागला. मला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. तब्येत बिघडल्यावर भावाने औषध आणून दिले, पण त्याचा काही फायदा झाला नाही.

अतुल परचुरे यांनी पुढे बोलताना सांगितलं की, मी अनेक डॉक्टरांकडे गेलो. यानंतर माझी अल्ट्रासोनोग्राफी झाली. यादरम्यान डॉक्टरांच्या डोळ्यात भीती दिसली. तेव्हा मला वाटले की काहीतरी बरोबर नाही. तेव्हा मला कळले की माझ्या यकृतामध्ये 5 सेमी लांबीची गाठ आहे आणि ती कर्करोगाची आहे. मी डॉक्टरांना विचारले की मी बरा होईल की नाही? भविष्यात सर्व काही ठीक होईल, अशी ग्वाही डॉक्टरांनी दिली. पण उपचाराचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला आणि माझी प्रकृती पूर्वीपेक्षा जास्तच बिघडली. शस्त्रक्रियेलाही विलंब झाला. (हेही वाचा - Ravindra Mahajani Passes Away: वयाच्या 77 वर्षी रवींद्र महाजनी यांच निधन; राहत्या घरात सापडला मृतदेह)

अतुल यांनी सांगितलं की, हा आजार योग्य वेळी ओळखला गेला. पण उपचाराची पहिली प्रक्रिया चुकली. माझ्या स्वादुपिंडावर याचा परिणाम झाला. त्यामुळे वेदनाही वाढल्या होत्या. योग्य उपचार न मिळाल्याने माझी प्रकृती बिघडली होती. मला नीट बोलताही येत नव्हतं. बोलतांना जीभ लटपटायची. डॉक्टरांनी सांगितले की, या स्थितीत मला थोडा वेळ थांबावे लागेल. आता शस्त्रक्रिया केल्यास कावीळ होण्याची भीती आहे. माझ्या यकृतात पाणी भरल्यामुळे माझा मृत्यूही होऊ शकतो. त्यानंतर मी डॉक्टर बदलले आणि स्वतःवर योग्य उपचार केले.

अतुल परचुरे हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. जे बर्याच काळापासून द कपिल शर्मा शोचा भाग आहेत. अतुल यांनी पुढे सांगितले की, मी बऱ्याच दिवसांपासून द कपिल शर्मा शो करत आहे. सुमोनाच्या वडिलांच्या भूमिकेसाठी मला बोलावलं होतं. पण कॅन्सरमुळे मी जाऊ शकलो नाही. कॅन्सर झाला नसता तर कपिलसोबत आंतरराष्ट्रीय सहलीला गेलो असतो. अहवाल आल्यावर समजेल की मी पूर्वीप्रमाणे बरा झालो की नाही.