Elvish Yadav And Sagar Thakur: युट्यूबर्सचे भांडण मिटले, मॅक्सटर्नसोबतचा फोटो शेअर करुन एल्विश म्हणाला,

'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT) या कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) आणि यूट्यूबर मॅक्सटर्न (Maxtern) उर्फ ​​सागर ठाकूर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील वादामुळे चर्चेत होता. सागर ठाकुर उर्फ मॅक्सटर्न यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन सांगितलं की त्यानं मारहाण प्रकरणी एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. एल्विशनं देखील या प्रकरणाबाबत एक व्हिडीओ शेअर केला होता. नुकताच एल्विशनं मॅक्सटर्नसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यांचे भांडण मिटल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा - Elvish Yadav On Controversy: मारहाण प्रकरणावर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "लोकांनी मला आरोपी ठरवलं")

एल्विश यादवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मॅक्सटर्नसोबतचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये एल्विश आणि मॅक्सटर्न हे हसताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना एल्विशने कॅप्शनमध्ये लिहिले, एक घर में बर्तन होते हैं, बजेंगे तो सही. भाईचारा ऑन टॉप",

पाहा एल्विशची पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)

 

काही दिवसापुर्वी सागरनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एल्विशवर अनेक गंभीर आरोप केले. या व्हिडीओमध्ये सागरनं सांगितलं की, त्यानं एल्विशच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एल्विशनं एक व्हिडीओ शेअर करुन मारहाण प्रकरणातील त्याची बाजू मांडली आहे. त्यानं या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं की,"मॅक्सटर्न मला म्हणाला तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत जाळीन"