युट्यूबर आणि नेहमीच अनेक विवादात नाव असलेल्या एल्विश यादव (Elvish Yadav) ने सागर ठाकुर (Maxtern) या युट्यूबरला बेदम मारलं आहे. या प्रकरणी सागर ठाकुरनं एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सागर ठाकुरनं (Sagar Thakur) एक व्हिडीओ शेअर करुन या प्रकरणातील त्याची बाजू मांडली. आता एल्विशनं देखील एक व्हिडीओ शेअर करुन त्याची बाजू मांडली आहे. एल्विशनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतो, "काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामधील एका व्हिडीओमध्ये मी मॅक्सटर्नला मारताना दिसत आहे. तर एका व्हिडीओमध्ये मॅक्सटर्न माझ्यावर आरोप करताना दिसत आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर तुम्ही सर्व लोकांनी मला आरोपी ठरवलं. (हेही वाचा - Elvish Yadav Booked For Beating Up: बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल; युट्युबरला केली होती मारहाण (Watch Video))

पाहा एल्विश यादवचा व्हिडिओ -

पुढे एल्विश यादव म्हणाला, "मी तुम्हाला आता माझ्या बाजूची स्टोरी सांगतो. तुम्ही मॅक्सटर्नचं ट्विटर अकाऊंट बघा, तुम्ही युट्यूब किंवा गुगलवर पण पाहू शकता की, मी बिग बॉसमध्ये जाऊन आठ महिने झाले. या आठ महिन्यांमध्ये मॅक्सटर्न माझ्या विरोधात बोलत आहे. मला तो पोक करत होता. तो मला गवार, दोगला असं बोलत होता., पुढे एल्विश म्हणाला  मॅक्सटर्ननं त्याच्या मित्राच्या कपड्यांच्या दुकानात मला बोलवलं. तिथं त्यानं पूर्ण सेटअप केला होता. कॅमेरा, माईक असा पूर्ण सेटअप त्यानं केला होता. यात कोणकोण सामील आहे, हे सगळं मला माहित आहे."

पुढे व्हिडीओमध्ये एल्विश म्हणाला, "मी ट्रोल करणाऱ्यांना विचारतो, तुमच्या घरांच्या कोणी असं बोललं तर तुम्ही काय कराल? हे सर्व भांडण झाल्यानंतर मी त्याला पुन्हा भेटायला बोलवलं. मला वाटलं त्याला खूप लागलं असेल म्हणून मी त्याला घरी बोलवलं होतं. पण तो आला नाही. त्यानं माझ्यावर एफआयआर केला.