दिल दोस्ती दुनियादारी फेम पूजा ठोंबरे हिचा पार पडला साखरपुडा; पाहा कोण आहे तिचा होणार नवरा (See Photos)
Pooja Thombre, Kunal Ahirrao (Photo Credits: Instagram)

Pooja Thombre Gets Engaged: मराठी टेलिव्हिजन विश्वातील पॉप्युलर कपल सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांच्या लग्नानंतर, दिल सोती दुनियादारी या प्रसिद्ध मालिकेतील अजून एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. झी मराठीवरील 'दिल दोस्ती दुनियादारी' मध्ये भोळ्याभाबड्या ऍनाची भूमिका साकारणारी पूजा ठोंबरे हिच्या साखरपुड्याचा सोहोळा नुकताच पार पडला. 14 डिसेंबर रोजी पूजाचा साखरपुडा पार पडला असून तिने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर साखरपुड्याची काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावर ऋता दुर्गुळे, इशा केसकर, सायली संजीव, मयुरी वाघ यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

पाहा साखरपुड्यातील हे काही फोटो ,

पूजाचा कुणाल अहिरराव सोबत साखरपुडा झाला आहे. कुणाल बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर तो ही मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहे. विशेष म्हणजे कुणाल अभिनयापेक्षाही क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून अनेक रिऍलिटी शोचं काम बघतो. बिग बॉस मराठी, सूर नवा ध्यास नवा अशा विविध कार्यक्रमांसाठी त्याने काम केलं आहे.

कुणाल आणि पूजेची ओळख तशी जुनीच. दोघेही फार आधीपासून नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील ललित काळा केंद्रातून दोघांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे.

पूजाच्या साखरपुड्यातील लुक बद्दल सांगायचं झालं तर, तिचा लुक आणि साडी अभिनेत्री आरती वडगबाळकर हिने डिझाईन केलं होतं. त्यामुळेच पूजाने आपल्या पोस्टमधून आरतीचे आभार मानले आहेत.

दरम्यान, पूजा ने टेलिव्हिजनवर अभिनयाची सुरुवात केली ती दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून आणि बघता बघता तिने साकारलेली ऍना प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागली. नंतर तिने दिल दोस्ती दोबारा या मालिकेत देखील काम केले. त्यात तिने आनंदी या गरीब मुलीची भूमिका साकारली.