Disha Vakani Dance Video: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शोमध्ये लोक दया भाभीला खूप मिस करत आहेत. आजही चाहते दयाभाभींच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, दया भाभी उर्फ दिशा वकानी एका बोल्ड गाण्यात दिसली आहे. गुजराती दयाबेनची प्रत्येक गोष्ट लोकांना आठवते. दरम्यान, दयाबेन (Dayaben) ची भूमिका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिशा वकानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा वकानीचा बोल्ड अवतार (Disha Vakani Bold Video) पाहायला मिळत आहे.
दिशा वकानीचा हॉट अंदाज -
आतापर्यंत तुम्ही दिशा वाकानीला दयाबेनच्या भूमिकेत गरबा खेळताना पाहिलं असेल. दिशा वाकानीचा नवीन व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिशा वकानी 'भिगरी गा...' गाण्यावर किलर परफॉर्मन्स देत आहे. व्हिडिओमध्ये दिशा वकानीने निळ्या रंगाची चोली आणि स्कर्ट घातला आहे. हा व्हायरल व्हिडीओ जो कोणी पाहतोय त्याचा विश्वास बसणार नाही की, ही त्यांची गुजराती सून दयाबेन आहे. या व्हिडिओमध्ये दिशा वाकानीसोबत अनेक लोकही दिसत आहेत. हा व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर तुम्ही दयाबेनचे हे रूप लवकर विसरू शकणार नाही. (हेही वाचा - Bhool Bhulaiyaa 2 Trailer: 'भूल भुलैया 2' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, कार्तिक मंजुलिकाशी घेणार पंगा)
दयाबेन 2017 पासून तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून गायब आहेत. त्यांच्या दयाळूपणाची झलक पाहण्यासाठी गोकुळधाम सोसायटीतील लोकच नव्हे तर त्यांचे चाहतेही हतबल झाले आहेत. निर्माते दिशा वकानीच्या पुनरागमनाचा शोध घेत आहेत. परंतु, अद्याप तिचा कोणताही पत्ता नाही.
अलीकडेच अशी बातमी आली होती की, दिशा वकानीच्या पतीने निर्मात्यांसमोर एकूण तीन अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य केल्या तर दिशा वाकानीचे पुनरागमन निश्चित आहे. रिपोर्ट्सनुसार, दिशाला दिवसभरात किमान एक तास काम करायला लावावे, अशी मागणी तिच्या पतीने निर्मात्यांकडे केली आहे. तसेच, सेटवर त्यांच्या मुलासाठी एक विशेष जागा व्यवस्था केली पाहिजे. दिशा वकाणी यांना हवी ती रक्कम देण्यात यावी, अशी तिसरी अट त्यांच्यावतीने ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की, निर्माते या तीन मागण्या पूर्ण करू शकतील की नाही?
व्हिडिओवर लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया -
दिशा वकानीचा हा अवतार पाहिल्यानंतर चाहत्यांचे होश उडाले आहेत. एका चाहत्याने 'टप्पूची आई बिघडली' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने 'जेठालालला सांगू का?' असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेक लोक अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. दिशाला या रुपात पाहण्याचा विचारही केला नव्हता, असंही काही जणांनी म्हटलं आहे. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान दिशा खूपच लहान होती. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिने अशी गाणी केली होती.