Boycott TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी,चाहत्यांकडून बहिष्काराची मागणी
TMKOC

Boycott TMKOC: सद्या तारक मेहका का उल्टा चष्मा ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेवर प्रेक्षकवर्गांनी संताप दाखवला आहे. सोशल मीडियावर बॉयकॉट तारक मेहता का उल्टा चष्मा असा हॅशटॅग ट्रेंड सुरु आहे. नेमका प्रेक्षकांनी कोणता विषय उचलला आहे या संदर्भात जाणून घेऊयात. तारक मेहका का उल्टा चष्मा ही मालिका बंद करा असं अनेक चाहत्यांनी म्हटले आहे. या मालिकेने गेल्या १५ वर्ष प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मात्र, या मालिकेला बंद करा असा म्हणण्याचे कारण म्हणजे दया भाभीची मालिकेतील एन्ट्री.  (हेही वाचा- 'मिसेस सोधी' जेनिफर मिस्त्रीने असित मोदींवर केले गंभीर आरोप, 15 वर्षांनंतर शोला केले अलविदा)

प्रेक्षकांनी अनेक वर्ष फक्त दया भाभीची या मालिके पुन्हा पदार्पण कधी होणार याकडेच लक्ष देऊन आहेत. मध्यांन्त दयाभाभीची मालिकेत लवकरच एन्ट्री होणार अशी चर्चा मनोंरजन विश्वात सुरु होती त्यामुळे प्रेक्षक वर्ग देखील खुश झाला होता. मात्र पुन्हा एकदा मालिकेने प्रेक्षकांना निराश केले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी मालिका बंद करा असा नारा लावला आहे. प्रेक्षकांनी प्रोमो पाहिल्यांनी पाहिल्यानंतरच प्रेक्षकांची पुन्हा निराशा झाली आहे,त्यामुळे अनेकांनी आम्हाला निराश करू नका असं कंमेट देखील सोशल मीडियावर केले आहे. खरतर टीआरपीसाठी प्रेक्षकांना फसवल जात आहे असं एका युजर्संनी कंमेट केल आहे.

पाहा प्रेक्षकांचे कंमेट

दया भाभी येईल असा फसवा प्रोमो दाखवून अनेकदा प्रेक्षकांची हिरामोड केली जात आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्ग मालिकेवर संतापला आहे. "#BoycottTMKOC मी देखील या ट्रेंडमध्ये सामील होणार आहे, मी 2021 पासून नवीन एपिसोड पाहणे बंद केले आहे,  फक्त खोटे बोलणे आणि त्यांच्या निष्ठावंत चाहत्यांच्या भावनांशी खेळणे चालू आहे," असे एका वापरकर्त्याने लिहिले सोशल मीडियावर कंमेट केले आहे.