Bigg Boss Marathi 2, Episode 90 Preview: बिग बॉसच्या घरात रंगणार BB Birthday Party कार्य, अभिजीत बिचुकले धरणार कमल हसनच्या लोकप्रिय गाण्यावर ठेका
Bigg Boss Preview 90 (Photo Credits: Twitter)

'बिग बॉस मराठी 2' (Bigg Boss Marathi 2) हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून हे पर्व संपण्यास आता शेवटचे 10 दिवस उरले आहेत. त्यामुळे गेले 3 महिने या घरात जी भांडणं, जो धुमाकूळ, कल्ला, पाहायला मिळाला ते सर्व बाजूला सारुन आता उरलेल्या स्पर्धकांनी शेवटचे काही दिवस आनंदात घालावे यासाठी बिग बॉस ने या घरात आज BB Birthday Party कार्य दिले आहेत. ज्यात सर्व स्पर्धक बेधुंद होऊन नाचताना, गाताना दिसतील. यात प्रत्येक स्पर्धकाला विशेष वेशभूषा देण्यात आली आहे.

त्याचबरोबर जसे एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीत जे प्रॉप्स वापरण्यात येतात तसेच प्रॉप्स येथे स्पर्धकांना देण्यात आले आहे. यात सर्वात मजेशीर गोष्ट पाहायला मिळणार आहे तो अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांचा अफलातून डान्स. ते 'आया रे राजा' या गाण्यावर ताल धरताना दिसतील. पाहा व्हिडिओ

तर आरोह वेलणकरही 'झिंगाट' गाण्यावर झिंगाट होऊनच नाचताना दिसेल.

नुकतेच बिग बॉस ने शिवानी (Shivani) आणि नेहा (Neha) या दोघींना फायनलचे तिकिट देण्यात आले असल्याचे घोषित केले. त्यानंतर ब-याच प्रेक्षकांमध्ये तसेच बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. तर काल झालेल्या मुद्रांकण टास्कमध्ये स्पर्धकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे बिग बॉसने शिवानी आणि नेहा सोडून सर्व सदस्यांना नॉमिनेट केले.

हे सर्व असले तरीही ही सर्व भांडण-तंटे विसरून आज सर्व स्पर्धक बेभान होऊन नाचताना पाहायला मिळतील. हे नक्की