Bigg Boss Marathi 2, Episode 86 Preview: बिग बॉस मराठी 2 च्या घरात आज रंगणार 'बिचुकले की अदालत'; शिव आणि वीणामध्ये बिनसलं
BIgg Boss Marathi (Photo Credits: Voot)

बिग बॉस मराठी 2 च्या घरामध्ये आता हीना पांचाळच्या (Heena Panchal) एक्झिटनंतर आजापासून नव्या आठवड्याला सुरूवात होणार आहे. बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) आता शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. शेवटचा दोन आठवड्यांचा प्रवास सुरू झाल्याने हा खेळ आता अधिक चुरशीचा झाला आहे. एकमेकांवर मात करून पुढे जाणारे खेळाडू आता विजेतेपदासाठी एकमेकांविरूद्ध उभे राहिले आहेत. यामधूनच आता बिग बॉस मराठी 2 च्या घरातील लव्ह बर्ड जोडी शिव ठाकरे (Shiv Thackeray) आणि वीणा जगताप (Veena Jagtap) यांच्यामध्ये खटके उडायला सुरूवात झाली आहे. यासोबतच घरात सार्‍यांच्या नाकीनऊ आणणारे अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale)  यांना शिवानीने बाथरूममध्ये डांबून ठेवले आहे. तर घरात 'बिचुकले की अदालत' हा खेळ रंगणार आहे. पहा काय झालंय आजपर्यंतच्या भागात 

वीणा- शिव मध्ये वाद

वीणा जगताप आणि शिव ठाकरे घरात सतत एकमेकांच्या प्रेमात असतात यावरून यंदा विकेंडचा डावमध्ये शाळा घेतल्यानंतर आठवड्याची सुरूवात शिव आणि वीणामधील वादाने झाली आहे. आज बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे पुढील आठवड्यासाठी सुरक्षित झाल्यानंतर आता वीणा त्याला दुर्लक्षित करत अ‍ॅटिड्युड दाखवत आहे असा आरोप शिवने वीणावर लावला आहे. त्यावरून रडत वीणाने मनातील भावना किशोरी शहाणे समोर व्यक्त केल्या आहेत.  पहा आजच्या भागाची झलक 

शिवानीने डांबलं बिचुकलेंना बाथरूममध्ये

अभिजीत बिचुकले यांना शिवानीने बाथरूममध्ये बंद केलं आहे. आता बाहेर पडायचं असेल शिवानीने माफी मागायला सांगितले आहे.

आज बिग बॉस मराठी 2 च्या घरात 'बिचुकले की अदालत'

अभिजित बिचुकले यांच्यासमोर आज घरातील सदास्यांवर त्यांनी लावलेल्या आरोपांचा आणि त्यावरील सफाईचा खेळ रंगणार आहे. हा खेळ 'बिचुकले की अदालत' म्हणून असेल.

हीना पांचाळच्या घरातून एक्झिटनंतर आता सार्‍यांच्याच डोक्यावर नॉमिनेशनची तलवार आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यात कोण घराबाहेर पडणार आणि तिकीट टू फिनाले कुणाला मिळणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.