Bigg Boss Marathi 2, Episode 80 Preview: अभिजीत बिचुकलेंच्या झोपण्यावरुन कॅप्टन नेहाची सटकली, नेहाच्या शिक्षेने बिचुकलेंच्या आणले नाकी नऊ
Bigg Boss Marathi 2 Preview 80 (Photo Credits: Voot)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) च्या घरातील राहिलेल्या सर्व स्पर्धकांसोबत तगडी टक्कर देऊन कॅप्टन्सी पदावर पहिल्यांदाच विराजमान झालेली नेहा शितोळे (Neha Shitole) सध्या चांगलीच चर्चेत आहे. घरातील कामांपासून ते घरातील लोकांच्या प्रत्येक हालचालींवर तिचे बारीक लक्ष आहे. मग यात तिने आपली जवळची मैत्रिण शिवानी सुर्वेची (Shivani Surve) देखील गय केली नाही. त्यातच आजच्या भागात घरातील नियमांचे भंग करणा-या अभिजीत बिचुकलेंनाही  (Abhijit Bichukale) नेहाच्या छळवादी शिक्षेस सामोरे जावे लागणार आहे.

यात बिचुकलेंचे सतत झोपणे बिग बॉसच्या घराला आणि घरातील सदस्यांना काही नवीन राहिलेले नाही. कालच्या भागात त्यांना झोपण्यावरून नेहाने अडगळीच्या खोलीत डांबले होते. मात्र ही शिक्षा बहुधा त्यांच्यासाठी पुरेशी नसावी की काय, ते आजही पुन्हा तेच कृत्य करताना दिसणार आहेत. यात नेहा त्यांना चक्क स्विमिंग पूल मध्ये उभे राहण्याची शिक्षा देणार आहे. आता ती बिचुकलेंना किती वेळ शिक्षा देते हे आजचा भाग पाहिल्यावरच कळेल.

दुसरीकडे वीणा जगताप (Veena Jagtap) आणि आरोह वेलणकरमध्ये (Aaroh Velankar) वीणाने त्याच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी गेला असता त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा- Bigg Boss Marathi 2, Episode 79 Update:अभिजित बिचुकले यांना हट्टीपणा भोवला, कॅप्टनशिप स्पर्धेतून बाहेर; सर्वांना मागे टाकत किशोरी आणि शिव ठरले दावेदार

तसेच आज शिव आणि किशोरी मध्ये होणा-या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणती टीम बाजी मारणार, तसेच आरोह आणि शिवमध्ये पुन्हा हाणामारी होणार, कोण रडीचा डाव खेळणार हे आजच्या भागात कळेलच.