बिग बॉसच्या घरात या आठवड्याच्या कप्तानपदासाठी 'मर्डर मिस्ट्री' नावाचा टास्क देण्यात आला होता. तर नेहमी प्रमाणेच घरातील सदस्यांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. तर रुपाली आणि वीणा यांच्यामध्ये कप्तानपदासाठी लढत रंगली. अखेर रुपाली हिची कप्तानपदी रुढ झाली आहे. त्यानंतर रुपाली हिने घरातील सदस्यांना विविध कामे वाटून देत असताना शिवला कामाला लावल्याने वीणा तिच्यावर भडकली असल्याचे आज पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून वीणा आणि रुपाली यांच्या मैत्रीमध्ये फूट पडली असल्याचे दिसून येत आहे. तसेच वीणाला आता शिव याच्या शिवाय कोणीही दिसत नाही अशी टिकासुद्धा तिच्यावर करण्यात आली. मात्र दोन मैत्रीणींमध्ये फूट पडल्यांतर त्यांच्यामध्ये बोलणेसुद्धा फार कमी झाल्याचे काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात दिसून येत आहे. मात्र आजच्या भागात शिवला रुपालीने काम सांगताच वीणा संतापते. तसेच प्रत्येकवेळी शिवला काम करायला लावते असे वीणा म्हटते. यावरुन दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या दोघींच्या वादाचा शेवट काय होणार हे पाहणे उत्सुकचे ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 2: माधव देवचक्के यालाच करा बिग बॉसचा विजेता, राखी सावंत हिचे चाहत्यांना वोट अपील (Watch Video)
कॅप्टन रुपालीने शिवला कामाला लावल्यामुळे वीणा आणि रुपालीमध्ये झालाय वाद...
पाहा #BiggBossMarathi2 #WeekendChaDaav आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @bhosle_rupali @officialveenie @shivthakare_ @abhijeetkellkar @TheHeenaPanchal pic.twitter.com/vGQRDs7KAz
— Colors Marathi (@ColorsMarathi) July 20, 2019
त्याचसोबत रुपाली या आठवड्यात कप्तानपद योग्य रितीने बजावते की नाही सदस्यांकडून ऐकायला मिळणार आहे. परंतु आज विकेंडचा डाव असल्याचे महेश मांजरेकर घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहेत. त्याचसोबत टास्कदरम्यान होणारे वाद किंवा एकमेकांवरुन केलेल्या चुगल्या काय सांगतात हे आजच्या भागात कळणार आहे.