Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरातील वाद विवाद, मतभेद, भांडणे हे सर्वांनाच नित्याचे झाले आहे. पण हे वाद प्रेक्षकांचे लक्ष वेधतात, त्यांना खिळवून ठेवतात आणि त्यावर चर्चा करायला देखील भाग पाडतात. बिग बॉस मराठी 2 च्या आजच्या भागात बंद पडलेले 'बी बी' हॉटेल पुन्हा सुरु करण्याचा टास्क स्पर्धकांना दिला जातो. या हॉटेलमध्ये पाहुणे म्हणून बिग बॉस सीजन 1 चे स्पर्धक हजेरी लावणार आहेत. यात शर्मिष्ठा राऊत, पुष्कर जोग, सई लोकूर आणि स्मिता गोंदकर या स्पर्धकांचा समावेश आहे.
या टास्कदरम्यान आपल्याला सुरेखाताई आणि वैशालीमध्ये कलिंगड-पपईवरुन वाद होताना दिसत आहे. येथे पहा प्रिव्ह्यू
बिग बॉसच्या घरात आलेल्या पाहुण्यांना खूश करण्यात स्पर्धक यशस्वी होणार का? की त्यांच्यासमोरच वाद होणार? कारण पाहुण्यांकडून अभिजीत केळकरच्या संयमाची परीक्षा घेतली जात आहे. अभिजीत गाण गात असताना पुष्कर सतत अडथळा निर्माण करत आहे. यामुळे अभिजीत त्याचा संयम तर गमावणार नाही ना? (पहा कालच्या एपिसोडमध्ये काय झाले?)
पहा व्हिडिओ:
अभिजीतच्या संयमाची घेतली जातेय परीक्षा...सततच्या होणाऱ्या या अपमानात त्याचा संयम राहणार की तुटणार...
पाहा #BiggBossMarathi2 रोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर @LokurSai @jogpushkar @AbhijeetNKelkar @shivthakare_ @SmitaGondkar pic.twitter.com/AUMEJAGBqN
— Colors Marathi (@ColorsMarathi) July 3, 2019
या टाक्सदरम्यान कोणत्या स्पर्धकांमध्ये कशावरुन वाद होणार? तसंच आलेल्या पाहुण्यांना खुश करण्यात स्पर्धक यशस्वी होणार का? का आलेल्या पाहुण्यांसमोरच वाद उफाळणार? का आलेले जूने स्पर्धकच नव्या स्पर्धकांचा संयम तपासणार? हे सर्व पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.