BBM2 Day 17 Promo: मागील आठवड्यात मैथिली जावकर (Maithili Jawkar) हिची बिग बॉस च्या घरातून एक्झिट झाली. आणि पुन्हा नवीन आठवड्यात पहिले कार्य म्हणजेच नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. त्यानंतर बिग बॉस स्पर्धकांना नवीन टास्क दिला आहे. बिग बॉस मराठी 2 च्या घरात शाळा भरली असून किशोरी शहाणे (Kishori Shahane) या शाळेच्या वर्गशिक्षिका आहेत. तर नेहा शितोळे, अभिजीत केळकर, विद्याधर गोखले, अभिजीत बिचुकले, शिवानी सुर्वे, माधव देवचक्के आणि दिगंबर नाईक हे विद्यार्थी झाले आहेत. यात विद्यार्थ्यांची शाळा घेण्यापेक्षा विद्यार्थीच एकमेकांची शाळा घेत आहे. त्यात बिचुकले यांचीच विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे शाळा घेतली हे तुम्हाला या प्रोमो मधून कळेलच.
#BiggBossMarathi2 च्या घरात भरलेल्या वर्गात स्पर्धक घेऊ लागलेत एकमेकांची शाळा. पाहा आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही.@ShitoleNeha @GmKishori @shiv_Thakare @imsurveshivani @vaishalimhade @PunekarSurekha @officialveenie @AbhijeetNKelkar pic.twitter.com/xMnPHuFlIb
— Colors Marathi (@ColorsMarathi) June 11, 2019
एकूण बिग बॉस मराठी 2 च्या घरात भरलेली शाळा खूपच धमाल-मस्ती पाहायला मिळणार असून, यात शिक्षिकेच्या भूमिकेत असलेल्या या किशोरी शहाणे या बंडखोर विद्यार्थ्यांना ताळ्यावर आणणार की हे विद्यार्थीच त्यांच्या नाकी नऊ आणणार हे पाहण्यासाठी बिग बॉस मराठी आजचा भाग अवश्य पाहा.
बिग बॉसच्या घरात बिग बॉस मिठाई या खेळाच्या माध्यमातून सोमवारची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. त्यानुसार बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी अपात्र सदस्यांना मिठाईच्या स्वरूपात तळून नॉमिनेट केलं. यानुसार पराग कान्हेरे, किशोरी शहाणे, नेहा शितोळे आणि दिगंबर नाईक नॉमिनेट झाला. तर वारंवार नियम मोडल्याने इम्युनिटी न मिळाल्याची शिक्षा ज्या सदस्यांमुळे मिळाली त्या दोन सदस्यांची नाव घरातील साऱ्यांनी एकत्र निवडली. यामध्ये माधव देवचक्के आणि अभिजीत बिचुकले या दोन सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.