Bigg Boss Marathi 2 | (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2, 8th June 2019, Weekend चा डाव Updates:  'तुझी लँग्वेज ऐकली तर कान फुटतील, लोक पळतील शिवाणी. तुला वाटतं लोकांना शिव्या येत नाहीत? तुझा सगळ्यांशी वाद होतो. तू खेळ खेळ तिथे. हा काय प्रकार आहे. सतत राग. तू तुझा राग कंट्रोल करण्याऐवजी तो वाढला आहे. तू तिथे जे काही वागते आहेस, ते एकदा तपासून पाहा', असे थेट शब्दांत सांगत बिग बॉस होस्ट महेश मांजरेकर यांनी शिवानी सुर्वे हिची शाळा घेतली. शनिवारी विकेंडचा डाव म्हणजे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसाठी झाडाझडतीच ठरली.

वीणा जगताप हिलाही महेश मांजरेकर यांनी चांगलेच सुनावले. शिवानी जी वागली आहे ते योग्य नाहीच. पण, तू वागली आहेस तेही बरोबर नाही. तू तुझी बाजू ज्या पद्धतीने मांडते आहेस त्या पद्धतीने शिवानीही बाजू मांडू शकते. हे ध्यानात ठेव असेही मांजरेकर यांनी वीणाला सुनावले.

बिचुकले यांच्या न्यायालयात वीणा आरोपी

बिग बॉसच्या घरात रंगलेल्या कोर्टात न्यायाधिश अभिजित बिचुकले यांनी वीणा जगताप विरुद्ध शिवानी भोसले या प्रकरणात वीणा जगताप यांना दोषी ठरवले. दोषी ठरल्यामुळे बिग बॉसच्या आदेश आणि नियमानुसार वीणा यांना शिक्षा भोगावी लागणार होती. त्यानुसार बिग बॉसमधील गार्डन एरियात जाऊन एका पाटीवर सॉरी बिग बॉस असे लिहून ती पाटी प्रत्येक वेळी बिग बॉसला दाखवायची आहे. तसेच, दुसरी शिक्षा अशी की घरातील भांडी घासायची. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2, 7th June 2019, Day 11 Episode 12 Updates: बिग बॉसच्या निर्णयामुळे स्पर्धकांमध्ये भुकंप; शिवानी सुर्वे आणि विना जगताप यांना बिग बॉसची शिक्षा)

पराग कान्हेरे चोंबडा - अभिजित केळकर

मांजरेकरांच्या शाळेत पराग कान्हेरे यांच्यावर अभिजित केळकर याने अनेक गंभीर आरोप लावले. पराग कान्हेरे हा चोंबडा आहे. सतत इतरांची वकिली करत राहतो. शेफ आहे पण घरात काही काम करत नाही. केवळ चोंबडेगिरी करणे हेच याचे काम आहे, असा आरोप अभिजित केळकर याने परागवर लावले. यावर मी काय आहे ते तू मला सांगण्याची गरज नाही, असे परागने प्रत्युत्तर दिले.

या आठवड्यात पराग कान्हेरे सेफ, अभिजित केळकर डेंजर झोनमध्ये

या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी आजून काही तास बाकी आहेत. पण, शनिवारी झालेल्या विकेंडच्या डावात महेश मांजरेकर यंनी सांगितल्याप्रमाणे पराग कान्हेरे सेफ झाले आहेत. तर, अभिजित केळकर डेंजर झोनमध्ये आहे. एकूण सहा सदस्य नॉमिनेट आहेत. त्यातील पराग सेफ झाला आहे. आता उर्वरीत पाच सदस्यांपैकी किती लोक सेफ आहेत हे उद्या म्हणजे रविवारीच कळणार आहेत. पाहूया काय होतंय.