Bigg Boss Marathi Episode 68 Preview (Photo Credits: Twitter)

बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात कालपासून सुरु असलेल्या Statue- Release खेळात आता पर्यंत किशोरी, नेहा, शिवानी, हीना यांच्या जवळच्या व्यक्तींना घरातील सदस्यांची भेट घेता आली. कुटुंबियांच्या भेटीने घरातील एकूणच वातावरण भावनिक झाले होते, त्यामुळेच का होईना पण आतपर्यंत एकमेकांच्या डोक्यावर चढून आरडाओरडा करणारे सदस्य काल अक्षरशः रडताना पाहायला मिळाले. आज हेच वातावरण आणखीन हळवे करत अभिजीत केळकर (Abhijit kelkar) याची दोन मुले सुद्धा घरात भेट देण्यासाठी येतात, अगोदरच क्षणाक्षणाला रडू येणारा अभिजीत यावेळेस आपल्या मुलांना बघून रडण्याऐवजी हसताना पाहायला मिळतो. मात्र वडिलांच्या व्हिडीओ कॉलने पुन्हा एकदा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटतो. हे हळवे वातावरण हलके करण्यासाठी मग घरात शिवच्या (Shiv Thackrey) आईची एंट्री होते. घरातील सदस्यांना भेटत असताना त्या साहजिकच विनाशी सुद्धा भेट घेतात. तसेच शिवला किशोरी यांच्याप्रमाणेच वीणा, शिवानी आणि हीनाला सुद्धा ताई म्हण असे खडसावतात. पाहा काय घडणार आजच्या भागात?

VOOT वर दाखवण्यात येणाऱ्या प्रोमोमध्ये, आजच्या भागाच्या सुरुवातीस गार्डन एरिया मध्ये शिवानी ही बिचुकलेना बडबडत असते. तुम्ही वीणाला स्वतःचे कपडे निवडायला सांगितले पण त्यावरून ती आपल्याला टोमणे मारत होती असेही शिवानी म्हणाली. यावरून त्यांच्यात वाद सुरु असतानाच घरात अभिजीत केळकर याच्या मुलांची एंट्री होते. खेळानुसार यावेळी सर्वचजण फ्रीझ असतात. अभिजितच्या बाजूला त्याची दोन मुले बसली असताना बिग बॉस त्याला आणखीन एक सुखद धक्का देत त्याच्या वडिलांचा व्हिडीओ मॅसेज दाखवतात. यामुळे घरातील वातावरण बरेच हळवे झालेले असते. त्यानंतर शिवची आई घरात एंट्री घेते. आपल्या रांगड्या गावाकडच्या भाषेत बोलत त्या घरातील सदस्यांची भेट घेतात.इतक्यात शिवला बिग बॉस कडून रिलीजचे आदेश दिले जातात, मग मात्र त्याच्यावर झोड घेत त्या त्याला समजावतात. तू घरातील सगळ्या मुलींकडून राखी बांधून घे असेही त्या सांगतात.

दरम्यान शिवच्या आईसोबत आणखीन एक महिला घरात येते बहुदा ही शिवाची बहीण असावी. शिवला समजावताना त्या सुद्धा त्याला स्वतंत्रपणे खेळण्याचा सल्ला देतात, इथे आलेलं सर्व समर्थ आहेत त्यामुळे तू तुझा गेम नीट खेळ आणि वीणाला तिचा खेळूदे असे सांगून त्या घराचा निरोप घेतात. यावेळीचा आठवडा हा घरातील सदस्यांसाठी बराच खास ठरला आहे. परिणामी घरात या आठवड्यात तरी आनंदी आनंद पाहायला मिळत आहे.