Bigg Boss Marathi 2, 03 August, Episode 70 (Photo Credit : Colors Marathi)

एपिसोडच्या सुरुवातीला बिग बॉसकडून रिन ‘चमकत राहा’ हे कार्य दिले जाते. यामध्ये सदस्यांना आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या किंवा आपण मदत घटनेबद्दल सांगायचे आहे. यामध्ये हीना तिने कसे एका भुकेलेल्या मुलाला अन्न दिले ते सांगितले. आरोहने त्याला कसे जिद्दीने अभिनयाचे पारितोषिक मिळाले ते सांगितले. किशोरीजींनी त्या कशाप्रकारे कर्करोगग्रस्तांना मदत करतात ते सांगितले. शिवने त्याच्या कॉलेजमधील एक किस्सा सांगितला. अभिजितने त्याच्या व्यसनी मित्राला त्यातून बाहेर काढण्यासाठी कसा प्रयत्न केला ते सांगितले. रुपालीने एका मुलीला काही काळासाठी दत्तक घेतले होते.

शिवानी या टास्कद्वारे तिच्या बॉयफ्रेंडचे अजिंक्यचे आभार मानते, तर नेहा तिने आतापर्यंत स्वतःला पुढे जाण्यासाठी कशी मदत केली ते सांगितले. हे सर्व झाल्यावर नेहमीप्रमाणे बिचुकले यांचे रुपाली आणि नेहा या दोघांशी छोट्या गोष्टीवरून खटका उडतो. अभिजित रूपालीला स्वार्थी म्हणाले याबाबत रूपालीचा पार चढतो. त्यानंतर महेश मांजरेकर यांची एन्ट्री होते. गेले काही दिवस सदस्यांचे कुटुंबीय भेटायला येत होते, ते आल्यावर जे काही बोलले असतील त्याबद्दल कोणी मनावर घेऊ नका असे सांगितले जाते. (हेही वाचा: शिवानीचे टास्कदरम्यानचे उद्धट बोल वीणाच्या आईने सुनावले, बिचुकले यांच्या परिवाराच्या स्वागताने सदस्य सुखावले)

त्यानंतर बिचुकले बाथरूम साफ करण्यास नकार देतात यावरून त्यांची चांगली शाळा घेतली जाते. इथे बिचुकले यांच्या उत्तरांमुळे विषय फार भरकटला जातो. त्यातून शाब्दिक चकमकही उडते. त्यानंतर हीना, शिव आणि अभिजित यांमध्ये जेवणावरून उडालेल्या खटक्याबद्दल स्पष्टीकरण मागितले जाते. सर्वकाही एकून घेतल्यावर हीना नक्की कुठे चुकीचे होती हे तिला सांगतात.

त्यानंतर आठवड्यातील सर्वात गाजलेले शिव-वीणा-भांडी भांडण चर्चेत येते. आरोहने नेहमीप्रमाणे आपले पुराण मांडल्यावर, महेश मांजरेकर शिवला त्यावेळी तो कसा चुकला होता हे समजावून सांगतात. त्यानंतर शिवानी मुद्दाम वीणाला कमी दाखवण्यासाठी तिचे काही तद्दन मुद्दे मांडतात. यानंतर शिवानीने वीणावर आरोप केले होते त्याबद्दल नक्की वीणा कुठे चुकली होती हे तिला सांगितले जाते. अभिजित जिंकल्यावर ज्याप्रकारे वीणा नाचत होती तेच पाहून शिवानीच्या मनात संदेह निर्माण झाला होता. त्यामुळे आपण ज्या संघात आहोत त्याच संघासाठी खेळ असे प्रत्येकाला सल्ला दिला जातो.