बिग बॉस चे 13वे (Bigg Boss 13) पर्व आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे, आज या बहुचर्चित शो चा आज महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या स्पर्धेत यंदा सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) , असीम रियाज (Asim Riyaz), शहनाज गिल (Shehnaz Gill) आणि रश्मी देसाई (Rashmi Desai) हे प्रबळ स्पर्धक आहेत. अंतिम सोहळा सुरु होऊन विजेत्यांचे नाव जाहीर व्हायला आता काही तासाचं अवधी शिल्लक असतानाच या खेळातील नेहमीच चर्चेत असणारा स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला च्या बाबतीत मोठे एक विधान समोर येत आहे. हे विधान सुद्धा कोणी अमुक तमुक व्यक्तीकडून नव्हे तर स्वतः बिग बॉसची विजेती शिल्पा शिंदे हिने केले आहे, साहजिकच यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर मुळात शिल्पाने म्हणटलंय काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, शिल्पा शिंदे हिने सिद्धार्थ शुक्ला सोबत आपण रिलेशन मध्ये असल्याचे सांगितले आहे, तसेच या नात्यात आपल्याला खूप त्रास झाला आहे, सिद्धार्थ हा रागीट स्वभावाचा व्यक्ती आहे, त्यामुळे अशा माणसाने कधी हा शो जिंकू नये असेही शिल्पा म्हणाली आहे.
स्पॉटबॉय ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने आपल्या नात्याविषयी सांगताना सिद्धार्थ हा खूप शिवीगाळ करायचा, त्याचा स्वभाव अत्यंत रागीट आहे, यामुले अनेकदा माच्या नात्यात वाद झाले होते, खूप त्रास सहन केल्यावर अखेरीस मी या नात्यातून बाहेर पडले. जेव्हा शिल्पाला सिद्धार्थच्या शो मधील खेळाविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने सिद्धार्थ हा शो जिंकण्यासाठी अजिबात लायक नसल्याचे म्हणत त्याने जिंकू नये अशी आशा व्यक्त केली आहे.
दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला याचे नाव याआधी सुद्धा अनेकींसोबत जोडण्यात आले आहे. शो मध्ये सुद्धा रश्मी देसाई ,शेफाली जरीवाला तसेच शेहनाज यांच्यासोबतही त्याचे नाव जोडले जात होते, या कारणामुळे तो यंदाच्या सीझन मध्ये अधिक चर्चेत राहिला.