Bigg Boss 12 Exclusive : घरात पुन्हा 'वाईल्ड कार्डच्या रूपात प्रवेश करू शकेन : नेहा पेंडसे
नेहा पेंडसे

बिग बॉस 12 च्या घरामध्ये नेहा पेंडसे ही एकमेव मराठमोळी मुलगी होती. यंदा सिंगल्स विरूद्ध जोडी असे युद्ध रंगले आहे. यामध्ये नेहा पेंडसे सिंगल्सच्या गटामध्ये होती. संयमी आणि हळूहळू खेळामध्ये पावलं ठेवणार्‍या नेहा पेंडसेकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या. मात्र महिन्याभरातच नेहा खेळातून आऊट झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. सेलिब्रिटींपैकी बाहेर पडणारी नेहा पेंडसे ही पहिली सदस्य आहे. करणवीरच्या तुलनेत नेहाला कमी मतं मिळाल्याने ती बाहेर पडली आहे.

नेहा पेंडसे आऊट

बिग बॉस 12 च्या घरातील नेहा पेंडसेचा प्रवास या आठवड्यात थांबला आहे. सुरूवातीला पोल डान्सद्वारा चर्चेत असणार्‍या नेहा पेंडसेकडून खेळामध्येही ठाम आणि रोखठोक भूमिका अपेक्षित होती. मात्र बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये नेहा संयमी खेळत होती. पहा Bigg Boss  12 च्या घरातील नेहा पेंडसेचा बोल्ड पोल डान्स अंदाज 

वाईल्ड कार्डने होणार एन्ट्री

लेटेस्टीशी बोलताना, नेहा पेंडसेने तिचे भविष्यातील काही प्लॅन्स सांगितले आहे. नुकतीच खेळातून बाहेर पडलेली नेहा पेंडसे एखाद्या वेकेशन जाणार आहे. कामाच्या बबातीत नेहा फार खुलेपणाने काहीच बोलली नसली तरीही भविष्यात नेहा वाईल्ड कार्डच्या रूपात घरात पुन्हा प्रवेश करू शकते असे संकेत तिने दिले आहेत. त्यामुळे नेहाच्या चाहत्यांनी अगदीच हिरमुसून जाण्याची गरज नाही. कारण कदाचित लवकरच ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते.