Ashutosh Kulkarni-Ruchika Patil Wedding: 'असंभव' मालिकेतून घराघरात पोहोचलेला आशुतोष कुलकर्णी याचे अभिनेत्री रुचिका पाटील सह झाले 'शुभमंगल सावधान', See Pics
Ashutosh Kulkarni-Ruchika Patil Wedding (Photo Credits: Instagram)

असंभव, दुनियादारी या झी मराठीवरील गाजलेल्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आशुतोष कुलकर्णी (Ashutosh Kulkarni) याचा अभिनेत्री रुचिका पाटील (Ruchika Patil) हिच्यासोबत विवाह झाला आहे. अगदी जवळच्या आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नात मराठी इंडस्ट्रीतीतील अनेक कलाकार देखील उपस्थित होते. त्यात अविनाश नारकर यांनी आपली पत्नी ऐश्वर्या नारकर यांच्यासह हजेरी लावली होती. 8 जानेवारी 2021 आशुतोष आणि रुचिका लग्नसोहळा पार पडला. अत्यंत साधेपणाने हा विवाहसोहळा संपन्न झाला असून या लग्नसोहळ्याचे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

आशुतोष कुलकर्णी याने 'लेक माझी लाडकी', 'असंभव', 'दुनियादारी', 'साथ दे तू मला', 'गंध फुलांचा गेला सांगून', 'चेकमेट' या मालिकांमध्ये काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashutosh Kulkarni (@shree.ashutosh)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchika Patil 🧿 (@mi_ruchika)

तसेच त्याची पत्नी अभिनेत्री रुचिका पाटील हिने देखील 'गणपती बाप्पा मोरया', 'असे हे कन्यादान' या मालिकांमध्ये काम केलं आहे.हेदेखील वाचा- Abhidnya Bhave Ties Knot Mehul Pai: अभिज्ञा भावे हिने मेहुल पै सोबत बांधली लग्नगाठ, पहा फोटो आणि व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashutosh Kulkarni (@shree.ashutosh)

रुचिका पाटीलने इंजिनिअरिंगची शिक्षण पूर्ण केलं असून 2014 साली ती श्रावण क्वीनमध्ये ती सेकेंड रनरप ठरली होती. आशुतोष आणि रुचिकाच्या लग्नसोहळ्याला मराठीतील आणि त्यांच्या मालिकांमधील कलाकार देखील उपस्थित होते.