#MeToo मध्ये फसलेल्या अनु मलिक यांची इंडियन आयडॉल शो मधून एक्झिट: रिपोर्ट्स
अनु मलिक (Photo Credits: Instagram)

#MeToo: प्रसिद्ध गायक अनु मलिक (Anu Malik) यांनी इंडियन आयडॉल (Indian Idol) या शो मधून एक्झिट घेतली आहे. या शोमध्ये अनु मलिक परिक्षक म्हणून आतापर्यंत काम करत होते. अनु मलिक यांच्या बाबत समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार असा दावा केला जात आहे की, त्यांनी गेल्या काही काळापासून त्यांच्यावर मीटू मोहिमेअंतर्गत काही आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे या आरोपांना कंटाळून सोनी टीव्ही वरील इंडियन आयडॉल हा शो अनु मलिक यांनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आयएनएस यांनी प्रसारित केलेल्या एका रिपोर्टमध्ये सुत्रांच्या अहवालाने असे म्हटले आहे की, अनु मलिक यांनी इंडियन आयडॉल या शो मधून परिक्षक पद सोडले आहे. गेल्या वर्षात मीटू अंतर्गत काही महिलांनी अनु मलिक यांच्यावर विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला होता. या आरोपांमुळेच गेल्या वर्षात सुद्धा अनु मलिक यांना शो सोडावा लागला होता. मात्र काही काळानंतर पुन्हा यंदाच्या सीझनमध्ये दिसून आले. यावरुन गायिका सोना मोहपात्रा गिने ट्वीटरवर त्यांच्या विरोधात मोहिम पुन्हा सुरु केली. त्यामध्ये सोना हिने सोनी टीव्ही आणि अनु मलिक यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या.(लग्नानंतर पहिल्यांदा राखी सावंतने शेअर केला आपल्या मुलीचा व्हिडिओ? Watch Video)

मीटू या कारणामुळेच पुन्हा एकदा अनु मलिक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तर काही दिवसांपूर्वी अनु मलिक यांनी त्यांच्यावर मीटू अंतर्गत लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्याबाबत त्यांनी सोशल मीडियात पोस्ट लिहून स्वत:ची बाजू मांडत आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. तसेच 1990 मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये अनु मलिक यांना भेटायला गेले असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याआधीही मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप एका लोकप्रिय गायिकेने केला होता.