'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री मोहेना कुमारी हिने सोशल मिडियावरुन दिली कोरोनाची लागण झाल्याची माहिती
mohena kumari (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या आता उच्चभ्रू लोकांच्या घरातही शिरकाव करु लागला आहे. बॉलिवूडमधील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र आता टीव्ही मालिकांमधील कलाकारांनाही याची लागण होऊ लागली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या हिंदी मालिकामधील अभिनेत्री मोहेना कुमारी (Mohena Kumari) हिला कोरोनाची लागण झाली आहे अशी बातमी आपल्याला काल (1 जून) ला मिळाली होती. आता तिच्यापाठोपाठ तिच्या घरातील कुटूंबातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. खुद्द मोहेनानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहेना कुमारीसह तिचा पती सुयश, सासु-सासरे आणि तिच्या मोठ्या जावेला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यामुळे या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. यामुळे मोहेनाने सर्व चाहत्यांचे आभार मानून आपल्या परिवारासाठी प्रार्थना करण्यास सांगितली आहे. अभिनेत्री मोहिना कुमारीसह, पती, सासू-सासरे अशा घरातील 7 जणांना कोरोना विषाणूची लागण

पाहा ट्विट

 

View this post on Instagram

 

🙏🏽

A post shared by Mohena Kumari Singh (@mohenakumari) on

सध्या मोहेना आपल्या पती सुयशसह अन्य कुटूंबातील सदस्यांसह ऋषिकेश एम्स रुग्णालयात भरती आहे. या सर्वांवर उपचार सुरु आहेत.  मोहिना कुमारी सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांचा कोठी परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील रीवा राजघराण्यात जन्मलेल्या मोहिना कुमारीने आपल्या करिअरची सुरुवात 'डान्स इंडिया डान्स' च्या सीझन 3 मध्ये केली होती. यानंतर ती 'दिल दोस्ती डान्स'मध्ये दिसली होती.