Zee Yuva: धनश्री काडगावकर म्हणजेच तुझ्यात जीव रंगला मधील नंदिता वहिनी चं डान्सिंग टॅलेंट पाहायला मिळणार Yuva Dancing Queen मधून
Dhanashri Kadgaonkar (Photo Credits: File Image)

झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) तुझ्यात जीव रंगला (Tuzhyat Jeev Rangala) या मालिकेतून राणा आणि अंजलीसोबतच नंदिता वहिनी हे पात्र देखील घराघरात पोहोचलं. कोणी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं तर कोणी तिच्या पत्राचा तिरस्कार. परंतु, त्या मालिकेला राम राम करत आता नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) आता दिसणार आहे एका नव्या रूपात आणि नव्या ढंगात. कोल्हापुरातील रांगडेपणा जरा बाजूला ठेवत ती आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे एका हटके अंदाजात 'युवा डान्सिंग क्वीन' या नव्या रिऍलिटी शोमधून.

झी युवा वाहिनीवर (Zee Yuva) नव्याने सुरु होणारा 'युवा डान्सिंग क्वीन' (Yuva Dancing Queen) हा एक डान्स रिऍलिटी शो असून त्यात अनेक तारका त्यांच्यातील नृत्याचं टॅलेंट प्रेक्षकांना दाखवणार आहेत. धनश्री ही मुळातच एक उत्तम क्लासिकल डान्सर असून या आधीही तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अनेक डान्स व्हिडिओ फॅन्ससोबत  शेअर केले आहेत.

दरम्यान, धनश्री सोबत या शोमध्ये दिसणार आहेत अनेक मराठी तारका. गायत्री दातार म्हणजेच तुला पाहते रे मधील इशा सुद्धा डान्सचं हे नवं चॅलेंज स्वीकारणार आहे.

Best Marathi TV shows 2019: 'बिग बॉस मराठी 2' ची अतरंगी दुनिया ते 'अग्गंबाई सासूबाई' मधील सासूसुनेचं विलक्षण नातं, हे आहेत 2019 मधील Top 10 मराठी शो 

युवा डाँसिन्ग क्वीन आजपासून झी युवा वाहिनीवर सुरु होत असून बुधवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. अवधूत गुप्ते शोचं सूत्रसंचालन करणार असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य हे परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत.