Ashutosh Gokhale VIral Video (Photo Credits: Instagram)

लॉकडाऊनपासून लोकांचे किंबहुना विरंगुळा म्हणून स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी कलाकारांचे शॉर्ट व्हिडिओज बनविण्याचे वेडं वाढतच गेले. सोशल मिडियावर व्हायरल असलेल्या व्हिडिओजवर, ट्रेंड असलेल्या चॅलेंजवर आपले व्हिडिओ बनवून ते सोशल मिडियावर पोस्ट करणे हे जणू कलाकारांचे फॅडच बनत गेले. असाच एक व्हिडिओ बनवलाय अभिनेता आशुतोष गोखले (Aashutosh Gokhale) याने. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' या मालिकेतील डॉ. कार्तिकची भूमिका साकारणारा आशुतोष आपली सहअभिनेत्री अनघा अतुल (Angha Atul) हिच्यासोबत तामिळ सुपरस्टार थलापति विजयच्या 'वाथी कमिंग' या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये मालिकेत साध्या भोळ्या दिसणा-या आशुतोषची एक वेगळीच बाजू आणि धमाकेदार अंदाज पाहायला मिळत आहे. आशुतोष आणि अनघाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 67 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.हेदेखील वाचा- शिल्पा शेट्टी पाठोपाठ जॉनी लीवर ची मुले Jamie आणि Jessey Lever थिरकले टॉलिवूड स्टार थलापति विजयच्या गाण्यावर, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashutosh Gokhale (@aashu.g)

मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेले कलाकार फावल्या वेळेत काहीतरी टाईमपास म्हणून असे व्हिडिओज बनवून सोशल मिडियावर टाकतात. मात्र या व्हिडिओजने मात्र त्यांच्या चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन होते. तसेच हे व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल देखील होतात. त्यातलाच आशुतोष आणि अनघाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय. त्यांच्या चाहत्यांनी देखील या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

याआधी शिल्पा शेट्टी, जॉनी लिव्हरची मुलं जेसी आणि जेमी लिव्हरने देखील तामिळ स्टार थलापति विजयचा 'वाथी कमिंग' गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. या आधी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने वाथी कमिंग गाण्यावर टिकटॉक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओ आपण खास थलापति विजयला समर्पित करत आहोत असे सांगत तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.