शिल्पा शेट्टी पाठोपाठ जॉनी लीवर ची मुले Jamie आणि Jessey Lever थिरकले टॉलिवूड स्टार थलापति विजयच्या गाण्यावर, Watch Video

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कॉमेडी स्टार जॉनी लीवर (Johnny Lever) यांच्या मुलांनीही या गाण्यावर आपला व्हिडिओ बनवला आहे. जेसी (Jessey Lever) आणि जेमी (Jamie Lever) या भाऊ-बहिणीने मिळून या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे.

शिल्पा शेट्टी पाठोपाठ जॉनी लीवर ची मुले Jamie आणि Jessey Lever थिरकले टॉलिवूड स्टार थलापति विजयच्या गाण्यावर, Watch Video
Jessey And Jamie Lever (Photo Credits: Instagram)

टॉलिवूडच्या गाण्यांची भुरळ सामान्यांसह बॉलिवूडला देखील पडली आहे. अनेक लोक या गाण्यांचे व्हिडिओज बनवून सोशल मिडियावर पोस्ट करत असतात. त्यात तामिळ स्टार थलापति विजयचा 'वाथी कमिंग' हे गाणे सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालेले आहे. या गाण्याचे छोटे व्हिडिओ बनवून चाहते सोशल मिडियावर शेअर करत असतात. अलीकडे अभिनेत्री शिल्पा शेट्टी या गाण्यावर आपला हटके डान्स स्टाईल व्हिडिओ शेअर केला होता. त्यापाठोपाठ आता बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कॉमेडी स्टार जॉनी लीवर (Johnny Lever) यांच्या मुलांनीही या गाण्यावर आपला व्हिडिओ बनवला आहे. जेसी (Jessey Lever) आणि जेमी (Jamie Lever) या भाऊ-बहिणीने मिळून या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे.

'हमारे अंदर का साउथ इंडियन आ ही जाता है' असं कॅप्शन देत जेसी ने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तसेची बहिण जेसीने देखील हा व्हिडिओ आपल्या इन्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.हेदेखील वाचा- Sidharth Malhotra ​​आणि Kiara Advani चा 'Shershaah' चित्रपट या दिवशी रिलीज होणार; करण जोहरने पोस्टर शेअर करत दिली माहिती

 

View this post on Instagram

 

A post shared by Jesse Lever (@jesse_lever)

या आधी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने वाथी कमिंग गाण्यावर टिकटॉक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओ आपण खास थलापति विजयला समर्पित करत आहोत असे सांगत तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

जॉनी लीवर यांची मुले जेसी आणि जेमी सोशल मिडियावर आपले अनेक शॉर्ट व्हिडिओ शेअर करत असतात. यात त्यांच्या डान्सचे, त्यांचे अॅक्टिंगचे तसेच अनेक मजेशीर व्हिडिओज देखील असतात.

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2021 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).