Sidharth Malhotra ​​आणि Kiara Advani चा 'Shershaah' चित्रपट या दिवशी रिलीज होणार; करण जोहरने पोस्टर शेअर करत दिली माहिती
Shershaah Film Poster (PC - Instagram)

बॉलिवूड फिल्म निर्माता करण जोहर (Karan Johar) ने आपल्या आगामी 'शेरशाह' (Shershaah) चित्रपटाची दोन नवीन पोस्टर्स शेअर करत या चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर चित्रपट 'शेरशाह' पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरचं संपणार आहे. हा चित्रपट 2 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना करण जोहरने म्हटलं आहे की, "कॅप्टन विक्रम बत्राची अघटित कथा मोठ्या पडद्यावर दाखविण्यासाठी तयार आहे. त्यांचा प्रवास दाखविल्याबद्दल आम्हाला सन्मान वाटतो. शेरशाह 2 जुलै 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णू वर्धन यांनी केलं आहे. '' (वाचा -  हेल्मेट आणि मास्क न घालता बाईक चालवल्याने बॉलिवूड अभिनेता Vivek Oberoi वर मुंबई पोलिसांची कारवाई)

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी आजकाल एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे शेरशाह चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकत्र आले. अलीकडेचं कियारा अडवाणी डिनर करण्याच्या निमित्ताने सिद्धार्थ मल्होत्राच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. यापूर्वी हे दोघेही नवीन वर्ष साजरे करण्यासाठी एका वैयक्तिक टूरवर गेले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

सिद्धार्थ आणि कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कियारा शेवट 'इंदू की जवानी' या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया' या चित्रपटात दिसणार आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रा ​​आगामी चित्रपट 'मिशन मंजू' आणि 'थँक गॉड' या चित्रपटात दिसणार आहे.