बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) विरुध्द वाहतूक नियमांनुसार ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली आहे. विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईक चालवल्याने विवेकला दंड ठोठावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विवेक ओबेरॉयने हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ. बीनु वर्गीस यांनी मुंबई पोलिसांना ट्विटर करून केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.
विवेक ओबेरॉयने स्वतः 14 फेब्रुवारी रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो हेल्मेटशिवाय तसेच मास्क न घालता दुचाकी चालवताना दिसला होता. विवेकला 500 रुपयांचे ई-चलान पाठवण्यात आलं आहे. (वाचा - 'हा FASTag नाही, SLOWTag होतोय' असे सांगत गीतकार संदिप खरे यांनी व्हिडिओद्वारे सांगितलेला आपल्याला आलेला वाईट अनुभव, Watch Video)
View this post on Instagram
अभिनेता विवेक ओबेरॉय याच्याविरुध्द मुंबई पोलिसांनी आयपीसीच्या कलम 188, 269, मोटार वाहन कायद्याच्या कलम 129, 177 आणि साथीच्या कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.