बॉलीवूडमध्ये पदार्पण (संग्रहित - संपादित प्रतिमा )

2018 मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये अनेक विविधांगी विषय हाताळले गेले. या नव्या विषयांसोबतच अनेक नवीन चेहरे बॉलीवूडमध्ये दाखल झाले. यात सर्वात चर्चेत जी नावे होती ती म्हणजे श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान. कंगनाने करण जोहरवर आरोप केला होता की, तो फक्त इंडस्ट्रीमधील नात्यातील लोकांनाच आपल्या चित्रपटात घेतो. त्यानंतर याबाबतीत अनेक चर्चा रंगल्या होत्या. काही अंशी यात तथ्यही होते मात्र यावर्षी हा समज काहीसा चुकीचा ठरला. चला तर पाहूया 2018 मध्ये कोणत्या कलाकारांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)– श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिने ‘धडक’ या चित्रपटामधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. धडक हा मराठी सैराटचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटानंतर अनेकांनी जान्हवीची तुलना श्रीदेवीशी केली होती. शशांक खैतान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

ईशान खट्टर (Ishaan Khattar) – जान्हवी कपूरसोबतच ईशानने देखील ‘धडक’मधून बॉलीवूडमध्ये पाय ठेवला. मात्र त्याआधी 'बियाँड द क्लाऊड' या आंतरराष्ट्रीय चित्रपटामधून त्याने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. माजिद माजिद यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ईशान हा शहीद कपूरचा भाऊ असल्याने त्याच्याकडून प्रेक्षकांच्या फार अपेक्षा होत्या. ईशानने देखील या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती.

सारा ली खान (Sara Ali Khan)– वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘केदारनाथ’मधून सैफची मुलगी सारा अली खान चित्रपटसृष्टीमध्ये आली. अभिषेक कपूरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटात नायकाची भूमिका साकारली आहे. केदारनाथ येथे आलेल्या महाप्रलयावर हा सिनेमा अधिरीत आहे. (हेही वाचा : या चित्रपटांचा Box Office वर होता बोलबाला; 'तुंबाड'ला प्रेक्षकांची विशेष पसंती)

बनिता संधू (Banita Sandhu) – याआधी बऱ्याच जाहिरातींमध्ये झळकलेल्या बनिता संधूने शूजित सरकार यांच्या 'ऑक्टोबर' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली. या चित्रपटात तिच्यासोबत वरून धवन मुख्य भूमिकेत होता.

मौनी रॉय (Mouni Roy)– छोट्या पडद्यावरील ‘नागीण’ मौनी रॉयने खिलाडी अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. बॉलिवूडमध्ये येण्याआधी मौनीने बऱ्याच टीव्ही मालिकेत काम केले आहे. आता तिचा 'मेड इन चायना' हा चित्रपट येणार आहे.

मिथिला पालकर (Mithila Palkar)– मराठी अभिनेत्री मिथिला पालकरने याआधी ‘मुरांबा’मधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने कट्टी बट्टी या चित्रपटात दुय्यम भूमिका साकारली होती. मात्र यावर्षीच्या 'कारवां' या चित्रपटातून तिने मुख्य अभिनेत्रीच्या रुपात बॉलिवूड डेब्यू केला. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता ‘दुलकर सलमान’ने देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

आयुष शर्मा (Aayush Sharma) – यावर्षी सलमान खानने आपला मेव्हणा आयुष शर्मासाठी 'लव्हयात्री' या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात आयुषसोबत वारिना हुसैनने देखील बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली. मात्र या चित्रपट फ्लॉप ठरला होता.

रोहन मेहरा (Rohan Mehra) – अभिनेता विनोद मेहराचा मुलगा रोहन मेहरादेखील ‘बझार’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये आला. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान आणि राधिक आपटे होते.