Kill Movie Teaser: अॅक्शन थ्रीलर 'किल' चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज, लवकरच सिनेमागृहात होणार प्रदर्शित
Kill Movie PC YOUTUBE

Kill Movie Teaser: बॉलिवूडचा आगामी चित्रपट किल (Kill) सद्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रोडक्शन करण जोहर (Karan Johar) करत आहे. निखिल नागेश भट्टने या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे. या चित्रपटाचे थीम अॅक्सन थ्रिलर आहे. चित्रपटाचं टीझर नुकतच रिलीज झाले आहे. टीझर पाहून प्रेक्षकांनी कौतुकाचे वर्षाव केला आहे. टीझर पाहून प्रेक्षकांनी चित्रपटाची उत्सुकता दाखवली आहे. (हेही वाचा- लाल सलवार, पंजाबी पारंपारिक पोशाख...तापसी पन्नू आणि मॅथियास बोई यांच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

किल चित्रपटात लक्ष्य लालवानी, तान्या मानिकतला आणि राघव जुयाल हे कलाकार मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. किलचा टीझर पाहून प्रेक्षकांच्या अंगाला काटा आला आहे. अॅक्शन थ्रिलर असा थीम असलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून लक्ष्य लालवानी याने सिनेमा सृष्टीत पदार्पण केले आहे. तसेच अभिनेत्री तान्या माणिकतला चित्रपटात झळकणार आहे. तीचा पहिलाचा बिग बजेट चित्रपट असणार आहे.

चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता दाखवली आहे. टीझरमध्ये दिसल्याप्रमाणे, दोघांचा प्रवास हा ट्रेनमधून होत आहे. दोघे ही सुरवातीला खुश आहेत. त्यानंतर ट्रेनमध्ये गुंड्याची टोळी येते आणि प्रवाशांचा छळ करते. छळाला कंटाळून लक्षने रुद्रा अवतार दाखवला आणि गुंड्यांना एकेक करून मारून टाकलं. चित्रपटातील काही चित्रीकरण दमदार आहे. लवकच चित्रपट सिनेमा गृहात प्रदर्शित होईल अशी माहिती दिग्दर्शकांने दिली.