The Accidental Prime Minister : इंटरनेवरवर  लिक झाला संपूर्ण 'द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर' चित्रपट
द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर (Photo Credits: Film Stills)

सध्या प्रदर्शानाधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला चित्रपट म्हणजे, ‘द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर’ (The Accidental Prime Minister). माझी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर, संजय बारू यांनी पुस्तक लिहिले होते, याच पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. 11 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र अवघ्या तीन दिवसांत हा चित्रपट इंटरनेटवर लिक झाला आहे. देशातील विविध भाषांमध्ये हा सिनेमा करण्यात आला आहे. यातील सिनेमाचे पायरेटेड वर्जन लिक झाले आहे.

तामिळ रॉकर्स  (Tamilrockers) या वेबसाईटवर हा सिनेमा लिक झाला आहे. या वेबसाईटवर याधीही इतर अनेक सिनेमे लिक झाले आहेत. यात रजीकांत यांचा ‘पेट्टा’, अमिताभ बच्चन आणि अमिर खान यांचा ‘ठग्‍स ऑफ हिन्दोस्‍तान’, रनबीर कूपरचा ‘संजू’ यासह अनेक सिनेमे प्रदर्शित होण्याच्या काही तासातच लिक झाले आहेत. यामध्ये बाहुबली चित्रपटाचाही समावेश होतो. सिनेमा प्रदर्शित झाल्‍यापासून तिनच दिवसात हा चित्रपटही लिक झाल्‍यामुळे बॉक्‍स ऑफिसवर चांगलेच नुकसान होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान निर्मात्यांनी यावर काही उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. (हेही वाचा : The Accidental Prime Minister सिनेमावरुन अनुपम खेर यांच्यासह 13 जणांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश)

दरम्यान कॉंग्रेसने या चित्रपटावर फार आक्षेप घेतला होता. त्‍यासाठी विविध भागात आंदोलने करुन विरोधही करण्यातही करण्यात आला. काँग्रेस पक्षाची आणि गांधी घराण्याची या सिनेमातून बदनामी होत असल्‍याचा आरोप काँग्रेसने केला आहे. परंतु, काँग्रेसचा विरोध झुगारुन सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.