Oscars 2022: सुर्याचा 'Jai Bhim' आणि मोहनलालचा 'Marakkar' यंदाच्या ऑस्करच्या यादीत
Jai Bhim & Marakkar (Photo Credit - Twitter & FB)

यंदा ओटीटीपासून (OTT) ते सिनेमागृहापर्यंत फक्त साऊथचे चित्रपट (South Movie) प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. गेले वर्षभर जरी चित्रपटगृहे पुर्ण क्षमतेने चालु झाली नाहीत, पण या वर्षात या साऊथ चित्रपचसृष्टीने सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांसमोर घेवुन आले आहेत. आता भारताबाहेरही, दक्षिणेतील चित्रपट ऑस्कर 2022 (Oscars 2022) शर्यती पर्यंत पोहोचले आहेत, जो जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा समजला जातो. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी जगभरातून 276 चित्रपट निवडले गेले आहेत, ज्यामध्ये दोन भारतीय चित्रपट आहेत आणि हे दोन्ही चित्रपट दक्षिणेतील आहेत. यामध्ये सूर्याचा 'जय भीम' (Jai Bhim) आणि मोहनलालच्या 'मरक्कर' (Marakkar) चा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट 2021 मधील सर्वात यशस्वी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहेत. भारतात प्रतिष्ठा आणि प्रसिध्दि मिळवल्यानंतर ते परदेशातही आपली कीर्ती पसरवण्यासाठी सज्ज झाले आहे.

Tweet

या आठवड्याच्या गुरुवारी रात्री, अकादमी पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसने जगभरातील 276 चित्रपटांना पुरस्कारांसाठी पात्र म्हणून मान्यता दिली आहे. भारतातील लोकांसाठी ही आनंदाची बाब आहे की त्यात भारतीय चित्रपट आहेत, एक तामिळ चित्रपट 'जय भीम' आणि दुसरा मल्याळम अॅक्शन चित्रपट 'मरक्कर' आहे. (हे ही वाचा Pushpa: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी, पोलिस बांधवांच्या भावना दुखावल्या प्रकरणी गृहमंत्र्यांनकडे तक्रार)

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे. जय भीमच्या निर्मात्यांनी ट्विट करून लिहिले आहे की, आम्ही ऑस्करच्या शर्यतीत आहोत. जय भीमने 94 व्या अकादमी पुरस्कार नामांकनासाठी 276 चित्रपट निवडले आहेत, ज्यामध्ये जय भीमने प्रवेश केला आहे. त्याने ती लिंक देखील शेअर केली आहे ज्यात सर्व चित्रपटांची संपूर्ण यादी आहे.

Tweet

सुर्याचा 'जय भीम' चित्रपट गेल्या वर्षी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज झाला होता. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले. त्याच वेळी, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक सीन देखील ऑस्करने आपल्या यूट्यूब चॅनलवरून प्रदर्शित केला होता, ज्यामुळे हा चित्रपट ऑस्करमध्ये चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती आणि आता या चित्रपटाची टॉप लिस्टमध्ये निवड झाली आहे. भारतातील सिनेप्रेमींना या चित्रपटाकडून खूप आशा आहेत.