(Photo Credit - Youtube)

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या पुष्पा द राइज (Pushpa The Rise) या चित्रपटाने थिएटरमध्ये  धमाल केली. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कमाई केली. दरम्यान, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. शिवार फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष साळवे यांनी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे. ” ‘पुष्पा’ या चित्रपटात पोलीस वर्दीचा वापर करून जनतेचा पोलीस प्रशासनवरील विश्वास उठेल असं दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस बांधवांना आणि पोलीस समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,” अशी तक्रार त्यांनी पत्राद्वारे केली गेली आहे.

“चित्रपट निर्माता व अभिनेता यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे आणि चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, एवढचं काय तर या पुढे असं चित्रीकरण जर करण्यात आलं तर ते आधीच थांबवलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्र गृहमंत्र्यांनी पाऊल उचलावं, जेणेकरून कुठलाही अभिनेता व निर्माता पोलीस प्रशासन, खाकीचा अपमान करण्याची हिंमत करणार नाही,’ अशी मागणी सुभाष साळवे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. (हे ही वाचा Gehraiyaan Trailer: दीपिका पादुकोनच्या ओटीटीवरचा पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, ट्रेलर प्रदर्शित)

या चित्रपटाची कथा ही लाल चंदनाच्या तस्करीवर आधारीत आहे. या चित्रपटातून लोकप्रिय अभिनेत्री समांथाने तिच्या करिअरमधलं पहिलं आयटम सॉंग केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार समांथाने तीन मिनिटाच्या गाण्यासाठी 5 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.