Surekha Sikri health update (Photo Credits: Instagram)

बालिका वधु (Balika Vadhu) या मालिकेत 'मॉं'साची कठोर भुमिका करत घराघरात पोहचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी (Surekha Sikri) यांंना काही दिवसांंपुर्वी ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke)  झाल्यावर त्यांंना तात्काळ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते त्यानंंतर त्यांंची प्रकृती स्थिर होती मात्र ई-टाईम्सच्या माहितीनुसार, सध्या हॉस्पिटलने सुरेखा यांंची प्रकृती नाजुक असल्याचे सांंगितले आहे तसेच त्यांंच्या फुफ्फुसांत पाणी झाले असुन शरीर सध्या उपचारांंना पुरेसा प्रतिसाद देत नाहीये असे सुद्धा सांंगण्यात आले आहे. मुंबईच्या यारी रोडवरील घरातुन सुरेखा यांंना 8 तारखेला जवळच्या क्रिटी केयर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्या 75 वर्षीय असुन सध्याच्या कोरोना परिस्थिती मध्ये हॉस्पिटलच्या टीमकडुन त्यांंच्या प्रकृतीकडे बारिक लक्ष ठेवले जात आहे.

डॉक्टरांंच्या माहितीनुसार, ब्रेन स्ट्रोक मुळे तयार झालेले Clots औषधे देउन काढावे लागणार आहेत, त्यासाठी वेळ जाणार आहे, सध्या सुरेखा शुद्धीत आहेत त्या बोलुही शकतात पण एकावेळी एकच शब्द बोलण्याची त्यांंच्यात ताकद आहे. त्यांची प्रकृती सुधारण्यास आणखीन बराच वेळ लागणार आहे.

दरम्यान, सुरेखा सिकरी यांंनी बधाई हो या सिनेमातुन शेवटचे काम केले आहे, त्या सध्या कोणत्याच प्रोजेक्ट मध्ये नाहीयेत परिणामी हॉस्पिटल मध्ये उपचारांंसाठी त्यांंना आर्थिक चणचण जाणवत आहे ज्याकरिता काही दिवसांंपुर्वी त्यांंच्या नर्सने बॉलिवूड करांंना मदतीचे आवाहन केले होते. यापुर्वी सुरेखा यांंना 2018 मध्ये सुद्धा ब्रेन स्ट्रोक येउन गेला होता.

सुरेखा सिक्री यांनी 'तमस', 'बधाई हो', 'मम्मो', 'नजर', 'सलीम लंगडे पे मत रो', 'झुबैदा', 'काली सलवार', 'रेनकोट', 'हमको दीवाना कर गये' अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशा त्या एक मातब्बर कलाकार आहेत.