आज भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आज सर्व भारतीय एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र संगीतकार अदनान सामी (Adnan Sami) याला एका पाकिस्तानी (Pakistan) ट्वीटर युजर्सने एक सोशल मीडियात खोचक प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नाचे अदनान सामी याने असे उत्तर दिले असून त्याचे कौतुक केले जात आहे.
पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. त्याच दिवशी एका युजर्सने अदनान सामी याला 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणार का असा खोचक प्रश्न विचारला. मात्र यावर सामी याने उत्तर देत असे म्हटले की, आज नाही उद्या शुभेच्छा देणार. म्हणजेच आज 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देणार असल्याचे त्याला उत्तर दिले आहे.(Mission Mangal: पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराचा फोन वाजवताच अक्षयकुमार याने केले असे काही जे पाहून सर्वांना हसू झाले अनावर)
I will... Tomorrow! 🎤👇 https://t.co/a2VU8IoLNw
— Adnan Sami (@AdnanSamiLive) August 14, 2019
सामी याने पाकिस्तानी ट्वीटर युजर्सला दिलेले उत्तर ऐकून सर्वजण खुश झाले आहेत.
अदनान सामी हा मूळचा पाकिस्तान लाहौर येथे जन्मलेला आहे. मात्र 1 जानेवारी 2016 पासून त्याला भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यात आले आहे. भारतामधील नागरिकत्व मिळवण्यासाठी सामी याने येथील वास्तव्य कायदेशीर असावे अशी मागणी भारताकडे केली होती. यावर तत्कालीन गृहराज्यमंत्री किरेन रिजाजून यांनी अदनान सामी याला भारतीय नागरिकत्वाची कागपत्र सोपविली होती.