Mission Mangal: पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराचा फोन वाजवताच अक्षयकुमार याने केले असे काही जे पाहून सर्वांना हसू झाले अनावर
अक्षय कुमारने पत्रकाराच्या मोबाईलसोबत असाच काहीसा खोडकरपणा अक्षयने केला आहे. झाले असे की, 'मिशन मंगल' (Mission Mangal) चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराचा मुलाखतीदरम्यान फोन वाजला. त्यावेळी अक्षयची प्रतिक्रिया पाहून तेथे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार (Akshay Kumar) याचा खोडकरपणा, त्यांचे प्रँक्स सर्वश्रुत आहे. त्याच्या या प्रँक्सना केवळ सहकलाकार नव्हे तर त्याची सासू डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) आणि त्याची बायको ट्विंकल खन्नालाही (Twinkle Khanna) बळी पडले आहेत. आता तर अक्षय कुमारने हद्द करत चक्क पत्रकाराच्या मोबाईलसोबत असाच काहीसा खोडकरपणा अक्षयने केला आहे. झाले असे की, 'मिशन मंगल' (Mission Mangal) चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराचा मुलाखतीदरम्यान फोन वाजला. त्यावेळी अक्षयची प्रतिक्रिया पाहून तेथे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
'मिशन मंगल' चित्रपटाची पत्रकार परिषद सुरु होती, त्यावेळी अक्षय, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू आणि चित्रपटातील इतर कलाकार आणि टीम यांची मुलाखत चालू होती. त्यावेळी ती रेकॉर्ड करण्यासाठी एका पत्रकाराने आपला मोबाईल या कलाकारांपुढे ठेवला होता. मात्र तो मोबाईल सायलेंटवर ठेवायचा विसरला. त्यावेळी अक्षय जे केले ते पाहून सर्वच जण पोट धरून हसू लागले. पाहा व्हिडिओ
अलीकडेच अक्षयने सोनाक्षी सिन्हासोबतही असाचा काहीसा खोडकर प्रकार केला होता. त्यावेळी सोनाक्षीने अक्षयला गमती गमतीमध्ये फटकारले ही होते.
(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2019 10:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

