Shreya Ghoshal (Photo Credits: Twitter)

Shreya Ghoshal ही गोड गळ्याची गायिका आता अनेकांच्या गळ्यातली ताईत झाली आहे. बंगाली, हिंदी सह मराठी सिनेमांमधीलही श्रेयाचा आवाज अनेकांना भुरळ घालणारा आहे. पण श्रेयाने सोशल मीडीयामध्ये शेअर केलेली तिची पोस्ट जगभरातील तिच्या चाहत्यांना काळजीत टाकणारी आहे. श्रेयाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमेरिकेत ओरलँडोमधील नाईट कॉन्सर्ट नंतरचा प्रसंग सांगितला आहे. त्यामध्ये अचानक आवाजात बिघाड झाला. त्रास होऊ लागला. 'माझा आवाज हा त्या कॉन्सर्टनंतर गेलाच होता. त्यामुळे मी खूप घाबरुन देखील गेले होते. काय करावे मला कळेना. अशावेळी माझे चाहते आणि डॉक्टर समीर भार्गव यांनी घेतलेली काळजी यासगळ्यांना मी धन्यवाद देते.' असं लिहलं आहे.

श्रेया घोषाल ओरलँडो नंतर अमेरिकेत न्युयॉर्क मध्ये गायली आहे. या कार्यक्रमानंतर तिचा अमेरिकेचा दौरा देखील संपला आहे. श्रेयाच्या पोस्ट नंतर तिच्या चाहत्यांकडून आवाजाची काळजी घ्या अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांकडून करण्यात आल्या आहेत.

श्रेयाची पोस्ट

दरम्यान श्रेया घोषाल ही गायिका म्हणून लहानपणापासूनच चर्चेत होती. सारेगमप या रिअ‍ॅलिटी शो मधून चिमुकली श्रेया प्रकाशझोकात आली. वयाच्या 6 व्या वर्षापासून शास्त्रीय शिक्षणाचे धडे घेतले. आज बॉलिवूडमध्येही आघाडीच्या पार्श्वगायिकांमध्ये श्रेयाचा समावेश आहे.  श्रेया ला 2010 उन्हाळ्याच्या यूएस दौर्‍यादरम्यान Ohio राज्याकडून सन्मान मिळाला आहे. आणि गव्हर्नर टेड स्ट्रिकलँडने (Governor Ted Strickland) 26 जूनला श्रेया घोषाल डे म्हणून घोषित केला आहे.