Shreya Ghoshal Day 2021: श्रेया घोषाल का होत आहे ट्विटरवर ट्रेंड? काय आहे त्यामागील कारण जाणून घ्या
Shreya Ghoshal Day 2021 (Photo Credits: Twitter)

तुम्हाला प्रश्न पडला असेल की गायिका श्रेया घोषाल ट्विटर वर एवढी ट्रेंड का होत आहे. तर मग या पाठी काय कारण आहे हे तुम्हाला समजायलाच हवे. श्रेया ला 2010 उन्हाळ्याच्या यूएस दौर्‍यादरम्यान Ohio राज्याकडून सन्मान मिळाला आहे. आणि गव्हर्नर टेड स्ट्रिकलँडने (Governor Ted Strickland) 26 जूनला श्रेया घोषाल डे म्हणून घोषित केला आहे. अशा प्रकारे आज श्रेया चे चाहते तिचा 11 वा वर्धापन दिन साजरा करीत आहेत. ट्विटरवर तिचे चाहते सतत तिला शुभेच्छा देत आहेत आणि म्हणून श्रेया घोषाल डे मायक्रो- ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे. (Shreya Ghoshal ने शेअर केली मुलाची पहिली झलक, नाव ठेवलं Devyaan Mukhopadhyaya )

या सर्व चाहत्यांच्या प्रेमामुळे श्रेयाने तिच्या ट्विटर वर सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.“Thank you for making it special every year! SHREYA GHOSHAL DAY is your day! Feel humbled.” असे म्हणत श्रेया ने क्यूट इमोजी ही ट्वीट केला आहे.

पाहा चाहत्यांचे ट्वीट

 

 

 

 

 

आम्हाला आशा आहे की आता तुम्हाला हे समजले असेल की 'श्रेया घोषाल दिवस' २६ जून साजरा  केला जात आहे. म्हणून सुंदर गायिकेला तिच्या दिवसाच्या शुभेच्छा देत आहे.